बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ४९व्या वर्षी मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी ‘पिंकविला’ने दिली होती. त्यानंतर मलायका अरोरा व अर्जुन कपूर गूड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता खुद्द मलायका अरोरानेच गरोदर असल्याच्या चर्चांवर मौन सोडत संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलायकाने ‘पिंकविला’ व त्यांच्या पत्रकारांना फटकारलं आहे. ‘पिंकविला’ने मलायका गरोदर असल्याची बातमी दिल्यानंतर अर्जुन कपूरने बातमीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत संताप व्यक्त केला होता. “अत्यंत खालच्या थराला जाऊन आणि तेही अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो. रोज अशा बातम्या तुम्ही देत आहात, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका”, असं त्याने लिहीलं होतं.

हेही वाचा>> Video: अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, ‘जय हिंद’ म्हणताच…

हेही वाचा>> ‘RRR’ समलैंगिक संबंधांवरील चित्रपट असल्याच्या दाव्यावर राजामौलींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी लोकांच्या…”

मलायकाने अर्जुन कपूरची ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत खोटी बातमी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. “हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे” असं तिने म्हटलं आहे. मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असून ही गूड न्यूज त्यांनी नातेवाईकांना दिली असल्याची बातमी पिंकविलाने दिली होती.

हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

मलायका अरोरा व अर्जुन कपूर गेले अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. मध्यंतरी ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress malaika arora on pregnancy news said its disgusting kak