Mamta kulkarni Vicky Goswami : ‘करण अर्जुन’ फेम लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी अखेर २५ वर्षांनी मुंबईत परतली आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर करिअरवर परिणाम झाला आणि ती जवळपास २५ वर्षे भारताबाहेर राहिली. १२ वर्षांपूर्वी एकदाच ती भारतात येऊ शकली होती, बाकी संपूर्ण काळ तिने भारताबाहेर घालवला. आता मुंबईत परतल्यावर ममता पुन्हा चर्चेत आली आहे.
५२ वर्षीय ममता कुलकर्णीने मुंबईत परतल्यावर एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ममताने लग्न केलं आहे, असं म्हटलं जात होतं. मात्र ममताने ती सिंगल असल्याचं सांगितलं. भारतात परतल्यावर तिने तिच्या व विकी गोस्वामीच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत ममताने विकी गोस्वामीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला. “मी विकीशी लग्न केलेलं नाही. तो माझा नवरा नाही. मी अविवाहित आहे. मी कोणाशीही लग्न केलेलं नाही. विकी आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो, पण मी त्याला ४ वर्षांपूर्वी ब्लॉक केलं,” असं ममता म्हणाली.
म
मी त्याला सोडून दिलंय – ममता कुलकर्णी
ममता पुढे म्हणाली, “विकी चांगला माणूस आहे. त्याचं मन खूप चांगलं आहे. इंडस्ट्रीतील सर्वजण त्यांना भेटायला यायचे, त्यामुळे मीही त्याला भेटायला जायचे. पण त्याला भेटायला गेलेली मी इंडस्ट्रीतील शेवटची व्यक्ती आहे. मला त्याचं सत्य समजल्यावर मी त्याला सोडून दिलं. तो दुबईच्या तुरुंगात होता. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न केले. विकी २०१२ मध्ये तुरुंगातून बाहेर आला होता. मी त्याला २०१६ मध्ये भेटले होते. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली. तो आता माझा भूतकाळ आहे. मी त्याला सोडून दिलंय.”
हेही वाचा – “एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…
विकी गोस्वामीला १९९७ मध्ये १० वर्षांची शिक्षा झाली होती. त्याच्यावर अवैध अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप होता. रिपोर्ट्सनुसार, ममता अनेकदा तुरुंगात त्यांची भेट घेत होती आणि तुरुंगात असतानाच दोघांनी लग्न केलं होतं, असं म्हटलं जायचं. पण आता ममताने स्पष्ट केलंय की ती विकीबरोबर नात्यात होती. त्यांनी लग्न केलं नव्हतं.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये २००० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव आलं होतं. गंभीर आरोप असूनही, ममताला अटक झाली नव्हती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिला क्लीन चिट देत तिच्याविरुद्धची तक्रार रद्द केली आहे. त्यानंतर ती आता मुंबईत परत आली आहे.