सुप्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंगचा आज ४१वा वाढदिवस आहे. ती सध्या आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये मग्न आहे. मोनाने बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच हिंदी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या कार्यक्रमामुळे ती प्रकाश झोतात आली. आजही मोनाला या कार्यक्रमामुळे ओळखलं जातं. आपल्या कामामुळे नावारुपाला आलेली मोना मात्र एका एमएमएस व्हिडीओमुळे चर्चेत आली होती.
२०१३मध्ये मोनाला एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला. २३ सेकंदाचा एक अश्लील एमएमएस सगळीकडे व्हायरल झाला. या एमएमएसमध्ये असणारी महिला विचित्र अवस्थेत होती. ही महिला मोनाच आहे अशी चर्चा रंगली. पण हे सारं खोटं असल्याचं मोनाने त्यावेळीच स्पष्ट केलं.
एमएमएसमध्ये दिसणारी महिला ही वेगळीच आहे. तिला माझा चेहरा लावण्यात आला असल्याचं मोनाने त्यावेळी म्हटलं होतं. त्याचबरोबरीने तिने यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रारदेखील केली होती. पण या एमएमएसमुळे मोनाला बऱ्याच प्रसंगांचं सामना करावा लागला. या प्रकरणामुळे तिचे लग्नही मोडलं होतं.
आणखी वाचा – Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
मोनाने २७ डिसेंबर २०१९मध्ये बॉयफ्रेंड श्यामशी लग्न केलं. मोना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पतीबरोबरचे फोटो शेअर करताना दिसते. याआधी टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय तसेच अभिनेता विद्युत जामवालबरोबर तिचं अफेअर होतं. मात्र तिचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.