हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय नेहमी चर्चेत असते. तिने बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती पती सूरज नांबियारबरोबर दुबईमध्ये राहत आहे. अशातच तिने गेल्या नऊ दिवसांपासून हॉस्पिटमध्ये दाखल असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे; ज्यामुळे मौनीच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयने काही फोटो शेअर करत लिहिले आहे की, “मी नऊ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होते. मला जी शांतता मिळाली त्याने मी भारावून गेले आहे. तुम्हाला मला सांगायला आवडेल की, मी घरी परतले आहे. सध्या हळूहळू रिकव्हर होत आहे. प्रकृती चांगल्या स्थितीत आहे. एक सुदृढ व आनंदी आयुष्य त्याच्या पुढे काहीच नाही. मी माझ्या जवळच्या व चांगल्या मित्रांचे आभार मानते, ज्यांनी या काळात माझी काळजी घेतली. माझ्यावर खूप प्रेम केलं.”

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

तसेच, पुढे मौनीने पतीविषयी लिहिले की, “तुझ्यासारखा कोणी नाही. मी नेहमी कृतज्ञ असेन. ओम नमः शिवाय.”

हेही वाचा – आलियाप्रमाणे पूजा व महेश भट्टही नाहीत १२ वी पास; अभिनेत्रीने केला खुलासा

हेही वाचा – गेट वे ऑफ इंडियासमोर बॉयफ्रेंडला लिपलॉक केल्यामुळे ‘ही’ अभिनेत्री चर्चेत; फोटो झाले व्हायरल

अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनाच नाही, तर कलाकारांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मौनीला नेमकं काय झालं आहे? याबाबत विचारत आहेत, तर काही जण अभिनेत्री लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. अभिनेत्री दिशा पटानीने मौनीच्या पोस्टखाली लिहिले आहे की, “लवकरात लवकर मौनी बरी हो.” तर मृणाल ठाकूरने लिहिले की, “बाळा काय झालं तुला? तू बरी आहेस? लवकर बरी हो.” तसेच निआ शर्माने तिला लवकर रिकव्हर होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – अभिनेत्रीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधला सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दिग्दर्शक, निर्माता अन् प्रमुख अभिनेत्याबरोबर…”

दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉय नेमक्या कोणत्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. पण, तिच्या या पोस्टमुळे अनेक तर्क-वितर्क मात्र लावले जात आहेत.

Story img Loader