बॉलीवूडमध्ये अनेक नवीन कलाकार येतात, काहींना यश मिळतं, तर काहींना अपयश. अनेक स्टारकिड्स बॉलीवूडमध्ये पदार्पण करतात, त्यापैकी सर्वच यशस्वी होतात असं नाही. दिग्गज अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरहानला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. त्याने १९९८ मध्ये ‘प्रेम अगन’ सिनेमातून पदार्पण केलं होतं.
फरदीनचा हा पहिला चित्रपट फ्लॉप झाला होता, पण आपल्या लूकने तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. त्याने ‘प्यार तूने क्या किया’, ‘ओम जय जगदीश’, ‘भूत’, ‘नो एंट्री’, ‘देव’, ‘फ़िदा’, ‘हे बेबी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याचे चित्रपट फारसे हिट झाले नाही, त्यामुळे नंतर तो इंडस्ट्रीपासून दुरावला.
फरदीन खानचं नाव सेलिना जेटलीशी जोडलं गेलं होतं, मात्र त्या केवळ अफवा होत्या असं म्हटलं जातं. फरदीन खऱ्या आयुष्यात दिग्गज अभिनेत्री मुमताज यांच्या मुलीच्या प्रेमात पडला. फरदीन मुमताज व मयुर माधवानी यांचा जावई आहे. त्याने पत्नी नताशाला विमान प्रवासात प्रपोज केलं होतं.
फरदीन खानची लव्ह स्टोरी
फरदीन व नताशा दोघेही लंडन येथून अमेरिकेला जात होते. तेव्हा फरदीनने नताशाला विमानात गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. या दोघांचं लग्न २००५ मध्ये झालं. या दोघांनी आपलं लग्न लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते शक्य झालं नाही. त्यांच्या संगीत सोहळा व रिसेप्शन मुंबईतील लक्झरी हॉटेलमध्ये झाले होते.
Chhaava: २२ व्या दिवशीही ‘छावा’चा जलवा कायम! कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, एकूण कलेक्शन जाणून घ्या
फरदीन खानचे लग्न
लग्नात फरदीन खानने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर नताशाने सुंदर लेहेंगा घातला होता. फरदीन व नताशाचं आंतरधर्मीय लग्न होतं. नताशा हिंदू आहे तर फरदीन मुस्लीम आहे. या जोडप्याने हिंदू व मुस्लीम दोन्ही पद्धतीने लग्न न करता नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं.
फरदीन खानची संपत्ती
फरदीन खान जवळपास ३३० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. तो बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. बऱ्याच काळापासून तो इंडस्ट्रीत सक्रिय नसला तरी त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. तो अनेक वर्षांनी २०२४ मध्ये ‘खेल खेल में’ या चित्रपटात झळकला होता, पण हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.