बॉलीवूडमध्ये कलाकारांची प्रेम प्रकरणे, लग्न व घटस्फोट यांसारख्या गोष्टी नेहमीच घडत असतात. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रेम प्रकरणे, लग्न व घटस्फोट या विषयांवर बऱ्याच चर्चाही होत असतात. बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांची अनेक प्रेम प्रकरणे झाली; मात्र त्यांनी त्यांच्या पन्नाशीतही लग्न केलेले नाही. त्यामध्येच १९९० च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचेसुद्धा नाव घेतले जाते. १९९० ला बॉलीवूडमध्ये आणि साऊथच्या चित्रपटांत झळकलेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे नगमा. (नगमा अरविंद मोरारजी).

नगमाच्या प्रेम प्रकरणांची चर्चा

नगमाचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. तिने आजवर तीन वेगवेगळ्या पुरुषांवर प्रेम केले; पण हे तिन्ही पुरुष आधीच विवाहित होते. त्यामुळे साहजिकच तिच्या प्रेम प्रकरणांना पूर्णविराम मिळाला. याच कारणामुळे तिचे लग्न होऊ शकले नाही. ती सध्या ४९ वर्षांची असून, ती अजूनही अविवाहित आहे.

aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Marathi Actress Deepali Sayed new hotel
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं नव्या क्षेत्रात पदार्पण! शिर्डीत भाविकांसाठी सुरू केलं हॉटेल, अनेक राजकीय मान्यवरांनी दिली भेट
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
pritish nandi died bollywood celebrities pays tribute
प्रसिद्ध निर्माते प्रीतीश नंदी यांचे निधन, करीना कपूरसह ‘या’ बॉलीवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली; संजय दत्त पोस्ट करत म्हणाला…
Constable Manju Fame Marathi Actor Wedding
‘कॉन्स्टेबल मंजू’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी देखील आहे अभिनेत्री, ‘या’ मालिकेत केलंय काम, लग्नातील फोटो आले समोर
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”

हेही वाचा…Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”

१९९० च्या दशकातील हिट अभिनेत्री

नगमाने (Nagma)आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानबरोबर ‘बाघी’ या चित्रपटातून केली होती. त्यानंतर तिने ‘यादगार’, ‘सुहाग’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार कामगिरी केली. बॉलीवूडमधील शाहरुख खान, संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबरही तिने काम केले आहे. तिचा अभिनयाचा प्रवास फक्त बॉलीवूडपुरता मर्यादित नव्हता. तिने साऊथ इंडस्ट्रीमध्येही चिरंजीवी, नागार्जुन यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. तिचा ‘घराना मोगुडू’ हा चित्रपट तिच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला.

वैयक्तिक आयुष्य आणि वादग्रस्त प्रेम प्रकरणे

नगमाला तिच्या व्यावसायिक आयुष्यात यश मिळाले; पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र तिला संघर्ष करावा लागला. तिचे नाव प्रसिद्ध क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्याशीही जोडण्यात आले होते. ‘बॉलीवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार ही बातमी सौरव गांगुलीच्या पत्नीला समजल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले.

हेही वाचा…“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…

नगमाचे नाव तमीळ अभिनेता शरतकुमार आणि भोजपुरी अभिनेता रवी किशन यांच्याशीही जोडण्यात आले होते. पण, हे दोघेही विवाहित असल्याने तिची ही नातीही संपुष्टात आली. नगमाने काही काळानंतर चित्रपटसृष्टीला अलविदा करून राजकारणात प्रवेश केला. ती सध्या काँग्रेस पक्षाची महासचिव आहे.

Story img Loader