‘रॉकस्टार’ या चित्रपटात काम करून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाखरी. ‘रॉकस्टार’नंतर तिने मोजक्याच भूमिका केल्या. पण तिच्या कामापेक्षाही जास्त तिच्या स्टाईलमुळे आणि तिच्यावेळी आयुष्यामुळे चर्चेत असते. तर आता तिला एकदा भुताचा अनुभव आला असल्याचा खुलासा करत तिने ती घटना सर्वांशी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करिअर करण्यासाठी नर्गिस प्रदेशातून भारतात आली. भारतात आल्यावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये ती भाड्याच्या घरात राहत होती. तर त्यानंतर काही दिवसांनी तिने स्वतःच घर घेतलं आणि ती तिथे शिफ्ट झाली. पण या तिच्या स्वतःच्या नवीन घरात आल्यावर तिला अनेक चित्र विचित्र अनुभव आले.

आणखी वाचा : रामायण – महाभारताशी ‘गदर २’चं आहे मोठं कनेक्शन, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी मुंबईत स्वतःच घर घेतलं तेव्हा मी खूप खुश होते कारण ते घर मी स्वतःच्या मेहनतीने घेतलं होतं. ते माझं घर हिल रोडवर स्मशानभूमीच्या जवळ होतं. त्या घरात राहत असताना मला विचित्र स्वप्न पडायची आणि अचानक रात्री अपरात्री जाग यायची. ती स्वप्न खूप भीतीदायक होती. एक भुतासारखा सहा फूट उंच पांढरे कपडे घातलेला माणूस स्मशान भूमीकडे घेऊन जातोय, स्मशानात हाताने खणायचा, मग माणसांची हाडे बाहेर काढायचा आणि मांस खायचा आणि मला काही खायला सांगायचा असं मला त्या स्वप्नांमध्ये दिसायचं. मला सलग चार रात्री हे स्वप्न पडलं.”

हेही वाचा : ओटीटीवर पदार्पण करणारी नर्गिस फाखरी चर्चेत; म्हणाली, “मी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न…”

पुढे ती म्हणाली, “मी त्या घरात फक्त चार दिवस टिकले. त्यानंतर मी मुंबईहून दिल्लीला शिफ्ट झाले. पण नंतर जी माणसं मुंबईतील माझ्या घरातील सामान पॅक करण्यासाठी आली होती त्यांनी मला सांगितलं की, त्यांना माझ्या खोलीमध्ये सहा मृत पक्षी सापडले. माझ्या घरात काय सुरु आहे याची मला कल्पना नव्हती.” नर्गिसचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress nargis fakhri shares her haunted experience she had in mumbai rnv