Nargis Fakhri Sister Aliya Arrested: ‘रॉकस्टार’ फेम बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिची बहीण आलिया फाखरी हिला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. आलियावर एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि त्याची मैत्रिण अॅनास्तेसिया स्टार एटीन यांच्या खूनाचा आरोप आहे. आलियाने न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे एका गॅरेजला आग लावली, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. आलियाने ईर्ष्येच्या भावनेतून हे धक्कादायक कृत्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलियाने दोन मजली गॅरेजला आग लावली, त्यात पीडितांचा जीव गुदमरल्याने आणि भाजल्यामुळे मृत्यू झाला, असा आरोप तपास आलियावर आहे. तिला जामीन नाकारण्यात आला आहे. डेली न्यूजच्या वृत्तानुसार, आलियाने न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे एका दोन मजली गॅरेजला आग लावली. या आगीत एडवर्ड जेकब्स आणि अॅनास्तेसिया जिवंत जळाले. आलियाला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयाने जामीन नाकारला आहे. “तिने जाणीवपूर्वक त्या दोघांना आगीत अडकवलं. धुरात जीव गुदमरल्याने आणि भाजल्याने दोन्ही पीडितांचा दुर्दैवी मृत्यू झाला,” असं डिस्ट्रिक्ट ॲटर्नी मेलिंडा कॅट्झ यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा – अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य

नर्गिस फाखरीच्या आईची प्रतिक्रिया

नर्गिस फाखरीने बहिणीवर लागलेल्या या आरोपांप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तिच्या आईने आलियाचा बचाव केला असून ती असं करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. “मला वाटत नाही की ती कोणाचा खून करेल. ती सर्वांची काळजी घेणारी आहे. ती सर्वांना मदत करते,” असं नर्गिसच्या आईने म्हटलं आहे.

हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

ब्रेकअप होऊनही आलिया करत होती एडवर्डचा पाठलाग

द पोस्टनुसार, एडवर्ड जेकब्सच्या आईने सांगितलं की एडवर्ड व आलियाचं नातं एक वर्षाआधी संपलं. ब्रेकअप होऊनही आलिया त्याचा पाठलाग करत होती. एडवर्ड व अॅनास्तेसिया हे रिलेशनशिपमध्ये नव्हते, तर फक्त मित्र होते. आलियाने गॅरेजला आग लावली, त्यात या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळी काय पाहिलं?

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराने प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला काहीतरी जळत असल्याचा वास आला, आम्ही बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा पायऱ्यांवर ठेवलेल्या सोफ्याला आग लागली होती. दोघांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला आगीतून उडी मारावी लागली. याआधी आलिया अनेकदा सर्वांना म्हणायची की ती त्याचे घर जाळून टाकेल, त्याला मारेल. पण आम्हाला ती गंमत करतेय, असं वाटायचं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress nargis fakhri sister aliya arrested for killing ex boyfriend his friend by setting them fire hrc