‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. त्यांच्याबरोबरच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचा ट्रेलरला आणि सगळ्या गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता आलिया भट्टच्या सासूबाई नीतू कपूर सूनेचं काम पाहून भारावल्या आहेत.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा नुकताच मुंबईत एक स्पेशल शो पार पडला. या प्रीमियर शोला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री नीतू कपूरही आल्या होत्या. हा चित्रपट पाहिल्यावर त्यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया आता चांगलंच लक्ष वेधलं आहे.
सूनेची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पाहून नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं आणि लिहिलं, “सर्वांचे मनोरंजन करणारा चित्रपट…सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय…आलिया भट्ट खूप सुंदर दिसत आहे.” तर यावर आलियाने ही स्टोरी शेअर करत “लव्ह यू” असं लिहिलं.
दरम्यान, २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंगशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत.