बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. १८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ट्वीस्ट, क्लायमेक्स व कलाकरांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना धरुन ठेवलं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात काही मराठमोळे कलाकार दिसत आहेत. यातीलच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने चित्रपटाच्याबाबतीत पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री नेहा जोशीने नाटक, मालिका क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतीच ती दृश्यम २ चित्रपटात दिसली आहे. नुकतीच ती जयपूर येथे तिच्या हिंदी मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेली असताना तिने दृश्यम २ चित्रपटगृहात पहिला आणि पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी चित्रपटाच्या प्रिमिअरला जाऊ शकले नाही जाऊ शकले नाही, कारण मी जयपूर येथे हिंदी मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मला माझा आनंद व्यक्त करता येत नाहीये, इतक्या मोठ्या चित्रपटाचा मी भाग आहे. हा माझा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. मी प्रीमियरला जायला मुकले तसेच मला कुटुंबाबरोबर चित्रपट बघायला मिळाला नाही याचे मला दुःख होत आहे.”

“तुझ्या चित्रपटाच्या सेटवर येईन पण…” शाहरुख खानने आर्यनसमोर ठेवली ‘ही’ अट

नुकतंच नेहा जोशी ही विवाहबंधनात अडकली आहे. ओमकार कुलकर्णी असे तिच्या पतीचे नाव आहे. नेहा जोशीचा पती हा मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ या नाटकात तिने फार उल्लेखनीय काम केले आहे. त्याबरोबरच ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा चित्रपटातही ती झळकली होती.

अभिजीत पाठक दिग्दर्शित या चित्रपटाने अकराव्या दिवशी ५.४४ कोटींची कमाई केली आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रतीक्षेत गेली अनेक वर्ष प्रेक्षक होते. अखेर सात वर्षांनंतर ‘दृश्यम २’ प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांकडून चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ हे मल्याळम चित्रपटाचे रिमेक आहेत. अजय देवगणसह या चित्रपटात तब्बू, श्रीया सरन, इशिता दत्ता, अक्षय खन्ना या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress neha joshi shared post that she missed premier of drushyam 2 spg