मागील काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. अशातच अभिषेक बच्चनचं नाव बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जाऊ लागलं. निम्रतबरोबर अफेअर असल्यानेच अभिषेकचा ऐश्वर्याशी घटस्फोट झाला, अशा चर्चा रंगल्या. मात्र आता निम्रतने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत निम्रत कौर म्हणाली, “मी काहीही केलं तरी लोक त्यांना हवं तेच बोलणार. अशा गॉसिप्स थांबणार नाहीत. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणं पसंत करते.” आयुष्यातील तथ्यहीन गोष्टींना फार महत्त्व देत नसल्याचं निमरत म्हणाली.

हेही वाचा – Video: किंग खानने सासूबाईंबरोबर धरला ठेका; शाहरुख खान अन् सविता छिब्बर यांचा व्हिडीओ पाहिलात का?

अभिषेक व निम्रतच्या अफेअरच्या अफवा

अभिषेक बच्चन व निम्रत कौर यांनी ‘दसवीं’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या. निम्रतमुळे ऐश्वर्या व अभिषेकचा घटस्फोट झाला असं म्हटलं जाऊ लागलं.

हेही वाचा – काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?

अनंत अंबानीच्या लग्नानंतर घटस्फोटाच्या चर्चा

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता. तर ऐश्वर्या मुलगी आराध्याला घेऊन वेगळी आली होती. एकाच ठिकाणी या दोघी मायलेकी व संपूर्ण बच्चन कुटुंब वेगवेगळे आल्याने अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. नंतर हे दोघे वेगळे झाले असून त्यांनी ग्रे डिव्हॉर्स घेतलं असं म्हटलं जातंय. अभिषेक व ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबापैकी कोणीही अद्याप या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा – ‘कबूल है’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, देवभूमीतील नॅशनल पार्कमध्ये केलं लग्न, फोटो आले समोर

अभिषेकने खरेदी केली मालमत्ता

नुकतीच अभिषेक व अमिताभ बच्चन यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली. स्क्वेअर यार्ड्सवरील नोंदणी दस्तऐवजानुसार, अमिताभ व अभिषेक यांनी ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम निवासी प्रकल्प इटर्नियामध्ये १० अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत. यापैकी ८ अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ प्रत्येकी १,०४९ चौरस फूट आहे. तर, इतर दोन अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ ९१२ चौरस फूट प्रत्येकी आहेत. २५.९५ कोटी रुपयांत त्यांनी १०,२१६ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता खरेदी केली आहे. यापूर्वी अभिषेकने बोरीवलीत फ्लॅट खरेदी केले.