छोट्या पडद्यावरील बहुचर्चित शोमध्ये ‘द कपिल शर्मा’चाही नंबर टॉपला आहे. या शोमध्ये कलाक्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावताना दिसतात. गेल्या भागामध्ये अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीने कपिल शर्माच्या या शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती. यावेळी नोराने खूप धमाल-मस्ती केली. शिवाय कपिलबरोबर अनेक चर्चाही रंगल्या. दरम्यान नोराने यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने यावेळी आपल्या सहकलाकाराबाबत सांगितलेला किस्सा खरंच धक्कादायक होता.
आणखी वाचा – Video : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसी नाईकचा नवरा पबमध्ये पार्टी करण्यात मग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
गप्पा रंगात आल्या असताना कपिलने नोराला एक प्रश्न विचारला. चित्रीकरणादरम्यान कधी कोणाशी तुझं भांडण झालं होतं का? या प्रश्नाला उत्तर देत नोराने एक किस्सा सांगितला. तिचा हा किस्सा ऐकून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.
नोरा म्हणाली, “बांग्लादेशमध्ये मी चित्रीकरण करत होते. तिथे चित्रीकरण करत असताना माझ्या सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केलं. मी कोणताच विचार न करता त्याच्या कानशिलात लगावली.”
आणखी वाचा – भावाच्या लग्नात प्राजक्ता माळीचीच हवा, नव्या वहिनीचं केलं जोरदार स्वागत, फोटो शेअर करत म्हणाली…
पुढे ती म्हणाली, “मी त्याला कानशिलात लगावल्यानंतर त्यानेही मला कानशिलात लगावली. मग मीही त्याला पुन्हा कानाखाली मारली. त्यानंतर तो माझे केस खेचू लागला. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला या वादामध्ये हस्तक्षेप करावा लागला.” नोराने सांगितलेला हा किस्सा ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला.