शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट त्याचे पहिले गाणे ‘बेशरम रंग’ रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावरून गदारोळ झाला. भगव्या रंगाची बिकिनी घालून दीपिकाने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे विरोधकांचे म्हणणे आहे. याबाबत सातत्याने बरीच विधानं समोर येत आहेत. अशातच आता अभिनेत्री आणि तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी याप्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे.

‘पठाण’च्या या गाण्यात बदल करण्याची मागणी होत आहे. शिवाय याच्या निषेधार्थ मध्य प्रदेशात शाहरुख आणि दीपिकाचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला गेला. त्यानंतर नुसरत जहाँ यांनी आदल्या दिवशी ट्विट करून चित्रपटाच्या समर्थनार्थ बाजू मांडली. अभिनेत्रीने ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “या लोकांना प्रत्येक गोष्ट खटकते. त्यांना हिजाब घालणाऱ्या महिला खटकतात, त्यांना बिकिनी घालण्याबद्दलही समस्या आहे. हेच लोक नव्या युगातील महिलांना काय घालावे हे सांगत आहेत. हे केवढं मोठं दुर्दैव आहे.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”

आणखी वाचा : बॉयकॉट ट्रेंड, रणवीरचं न्यूड फोटोशूट ते दीपिकाची भगवी बिकिनी; २०२२ मध्ये या वादग्रस्त घटनांची होती सर्वात जास्त चर्चा

यावरून भाजपावर निशाणा साधत नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं की, “‘हे कोणत्याही विचारधारेशी संबंधित नाही. हे सत्तेत बसलेल्या पक्षाचं काम आहे. एका विशिष्ट समाजाची प्रतिमा बनवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. हे एक प्रकारचं षडयंत्र आहे. त्यामुळेच ते संस्कृतिच्या रक्षणाबद्दल आणि बिकिनी घालणाऱ्या महिलांबद्दल वक्तव्य करत आहेत.”

पुढच्या वर्षी म्हणजेच २५ जानेवारीला ‘पठाण’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. शाहरुख आणि दीपिकाच्या या गाण्यातील हॉट केमिस्ट्रिची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल ४ वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Story img Loader