अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं. ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. तिने तिची आई श्वेता तिवारीबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पलक आणि श्वेता यांचं नातं खूप खास आहे. पलक श्वेताची मुलगी असली तरीही त्या दोघीही एकमेकींबरोबर मैत्रिणीप्रमाणे वागतात, असा अंदाज त्यांचे चाहते नेहमीच व्यक्त करत असतात. मात्र आता खरी गोष्ट काय हे स्वतः पलकने सांगितलं आहे. श्वेता तिवारीला ‘देसी आंटी’ म्हणत पलकने आईचा तिच्यावर किती धाक आहे, याचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “ती अनेकदा माझे फोनही उचलत नाही…” पलक तिवारीचा आई श्वेता तिवारीबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, “मी सलमान खानच्या…”

‘कर्ली टेल’ला दिलेल्या मुलाखतीत पलक म्हणाली, “माझी आई एक कूल आई असण्याबरोबरच एक ‘देसी आंटी’सारखीही आहे. २० रुपयेही खर्च करण्यासाठी अजूनही मला माझ्या आईची परवानगी घ्यावी लागते. जर मी काही शॉपिंग केलं तर त्याची किंमत किती हे मला दर वेळी हिला सांगावं लागतं. जर कधी मला कार्ड वापरून पैसे कोणाला द्यायचे असतील तर त्याचा ओटीपी आईकडे जातो. ओटीपी देण्याआधी आई मला, ती रक्कम तू कुठे खर्च करते आहेस? असं विचारते. तर कधी कधी ती मला पैसे खर्च करण्यावरून ओरडते. मग त्या वेळी तिची समजूत काढावी लागते आणि तोपर्यंत तो ओटीपी एक्सपायर झालेला असतो. मग मला पुन्हा एकदा नवा ओटीपी तिच्याकडे मागावा लागतो.”

हेही वाचा : “प्रत्येक पार्टीत आर्यन…” पलक तिवारीचा शाहरुख खानच्या लेकाबद्दल मोठा खुलासा

ती पुढे म्हणाली, “जर माझी कधी काही चूक झाली तर ती मला मारत नाही पण अशी नजर देते की ती पाहूनच समोरच्या व्यक्तीचा थरकाप उडेल. मग मी तिच्या त्या नजरेकडे बघूनच म्हणते की, अशी चूक मी पुन्हा करणार नाही.” पलकचं हे बोलणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे. पलकच्या या बोलण्यामुळे श्वेता तिवारीची दुसरी बाजूही चाहत्यांसमोर आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress palak tiwari calls her mother desi aunty and revealed she has to asked mom to spend money rnv