बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक म्हणून तिला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. त्यात आता परिणीतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. त्या दोघांच्या कुटुंबियांची बोलणीही सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : परिणीती चोप्राशी लग्न कधी करणार? या प्रश्नावर खासदार राघव चड्ढा लाजत म्हणाले…
नुकतंच परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ती विमानतळावरुन पार्किंगच्या दिशेने जाताना दिसत आहे. यावेळी तिला अनेक पापाराझींनी राघव चड्ढा यांच्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी तिने काहीही बोलण्यास नकार दिला.
‘तुमच्याबद्दल प्रसारमाध्यमात बातम्या येतात, त्या खऱ्या आहेत का?’ असा प्रश्न तिला पापाराझींनी विचारला. यावेळी राघव चड्ढा यांचे नाव घेतल्यावर परिणीती लाजली. ती गालातल्या गालात हसत असल्याचेही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हा आनंद कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्रियदर्शनी इंदलकरला देण्यात आलेला नकार, कारण…
परिणीतीच्या या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. “परिणीतीचा चेहराच सांगतोय की ही बातमी खरी आहे”, अशी कमेंट एकाने या व्हिडीओवर केली आहे. तर एकाने “ही हसतेय म्हणजे हे नक्कीच खरं आहे”, असं म्हटलं आहे.