बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक म्हणून तिला ओळखले जाते. तिला कायमच तिच्या लूक आणि फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. परिणिती चोप्रा ही लवकरच ३४ वर्षांची होणार आहे. मात्र अद्याप ती अविवाहित आहे. अनेकदा तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. मात्र ती त्यावर उत्तर देणं टाळते. नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे.
परिणिती चोप्राने नुकतंच ‘नवभारत टाईम्स’ या वेबसाईटला मुलाखत दिली. ती तिचा आगामी ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आली होती. यावेळी तिने तिचे आगामी चित्रपट, वैयक्तिक आयुष्य, बॉलिवूडमधील बॉयकॉट ट्रेंड याबद्दल भाष्य केले. यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. ‘काही दिवसांपूर्वी तू तुझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शअर केली होतीस, तू तुझी बहिण प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे लग्न आदर्श लग्न असल्याचे मानतेस, मग तू तुझ्या लग्नाबद्दल का विचार करत नाही?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला.
आणखी वाचा : Video : “माझं नाव शाकाल नाही….” अभिनेते वैभव मांगले संतापले; पाहा नेमकं काय घडलं?
त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “तुम्ही तर माझ्या जखमेवर मीठ चोळत आहात. मी सध्या दुर्बिण घेऊन मुलाचा शोध घेत आहे. माझ्या मते प्रेम ही फार सुंदर गोष्ट आहे. जर मला योग्य व्यक्ती सापडला तर मी तुम्हा सर्वांना आनंदाने सांगेन. खरं सागांयचे तर मी लग्नासाठी ज्या प्रकारच्या मुलाच्या शोधात आहे त्याचे निकष फारच उच्च आहेत.”
“लग्नाबद्दल माझे मत फार वेगळे आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही लग्न करु नये. मग ते तुम्हाला वयाच्या ८० व्या वर्षी जरी मिळाले तरीही..!! मात्र जर तुम्ही काहीही प्रेम नसलेल्या अशा लग्नबंधनात अडकलात तर मात्र त्यापेक्षा वाईट आयुष्य काहीही असू शकत नाही. तुम्ही लग्नाच्या वयाचे आहात म्हणून तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी लग्न करावे हे मला अजिबात पटत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडत नाही, त्याच्याबद्दल तुमच्या हृदयात, मनात घंटी वाजत नाही तोपर्यंत मी तरी निश्चित लग्न करणार नाही,” असेही तिने सांगितले.
आणखी वाचा : “चांगल्या मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळाल्याने…” रितेश देशमुख बॉलिवूडबद्दल स्पष्टच बोलला
“सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करावं अशी देवाची इच्छा आहे. मी माझ्या कारकिर्दीच्या एका अतिशय चांगल्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे माझे मन कुठेही दुसरीकडे नाही, याचा मला आनंद आहे”, असे परिणिती स्पष्टीकरण देताना म्हणाली.