बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी या दोघांचा साखरपुडा पार पडला. आता परिणीती आणि राघव यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
परिणीती चोप्राने नुकतंच इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली. यात तिने साखरपुड्याला आलेल्या नातेवाईकांचे आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : Video : परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या साखरपुड्यातील Inside व्हिडीओ समोर, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
“गेल्या काही आठवड्यांपासून मी आणि राघव व्यस्त होतो. पण साखरपुडा आणि या दरम्यानच्या काळात तुमच्याकडून मिळालेले प्रेम आणि सकारात्मकतेमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आम्ही दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात आहोत. पण मला हे जाणून आश्चर्य वाटले की आमच्यामुळे दोन वेगवेगळे क्षेत्र एकत्र आले. आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती त्यापेक्षा मोठे कुटुंब आम्हाला मिळाले.
आम्ही वाचलेल्या आणि पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे आम्हाला खूप आनंद झाला. याबद्दल आम्ही तुमचे आभार शब्दात व्यक्त करु शकत नाही. तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहाल, हे जाणूनच आम्ही या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याबरोबरच मीडियातील खास मित्रांचे खूप आभार. त्यांनी दिवसभर या ठिकाणी थांबून आम्हाला प्रोत्साहन दिले, त्यासाठी त्यांचे धन्यवाद”, असे परिणीतीने यावेळी म्हटले आहे.
आणखी वाचा : Made For Each Other! परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?
दरम्यान परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा शनिवारी १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघवनेही त्याच रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. “मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”, असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे. या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.