बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांनी २४ स्प्टेंबरला लग्नगाठ बांधली. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक नेते उपस्थिती लावली होती. परिणीती आणि राघव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “माझे फोटो पॉर्नोग्राफिक साइटवर…”, जान्हवी कपूरने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “माझे मित्र-मैत्रिणी…”

दरम्यान परिणीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघव यांच्या लग्नातील प्रत्येक क्षण दाखवण्यात आले आहेत. व्हिडिओ शेअर करत परिणीतीने लिहिलं. ” माझ्या नवऱ्यासाठी. मी गायलेलं सगळ्यात महत्वाचं गाणं” या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. परिणीतीचा भाऊ शिवांगने परिणीती तू खूप गोड आणि राघव खूप हॅंडसम दिसत आहे, अशी कमेंट केली आहे.

या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला एक गाणं लावण्यात आलं आहे. ‘ओ पिया, ओ पिया, चल चलें आ. बाट लें गम-खुशी साथ में’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं खुद्द परिणीतीने राघव यांच्यासाठी गायलं आहे. हे गाणे गौरव दत्ता यांनी संगीतबद्ध केले असून गौरव, सनी एमआर आणि हरजोत कौर यांनी ते लिहिले आहे.

हेही वाचा- “त्याच्या ओठांचा स्पर्श होताच मला…” रवीना टंडनचा ‘त्या’ इंटिमेट सीनबाबत मोठा खुलासा, म्हणाली…

लग्नानंतर परिणीती आणि राघव ३ ठिकाणी रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मुंबई, दिल्ली आणि चंदीगढमध्ये. बॉलीवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत, राजकीय नेत्यांसाठी दिल्लीत आणि नातेवाईकांसाठ चंदीगढमध्ये परिणीती आणि राघव रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता दिल्ली आणि चंदीगढमधील रिसेप्शनचा विचार तुर्तास रद्द करण्यात आला असून फक्त मुंबईतच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ४ ऑक्टोबरला मुंबईत परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress parineeti chopra share her wedding video on instagram see unseen moment dpj