अभिनेत्री पायल घोष हे हिंदी आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. मध्यंतरी पायल ‘मी टू’ चळवळीत केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून पायलने इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबाबत आपले स्पष्ट मत मांडले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यावर पायलने काही वेळातच ती डिलीट केली. मात्र, त्या पोस्टमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : “स्वच्छतागृह नसल्याने दिवसभर…” रेणुका शहाणेंनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा; म्हणाल्या, “माधुरी दीक्षितने फार सांभाळले”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

पायलने तिच्या ११ व्या चित्रपटाची घोषणा करताना इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली. तिने या पोस्टमध्ये लिहिले, “‘फायर ऑफ लव्ह रेड’ या चित्रपटाच्या निमित्ताने इंडस्ट्रीत मी माझा ११ वा चित्रपट पूर्ण करत आहे. जर मी (कोणाबरोबर) झोपले असते, तर आज माझे ३० चित्रपट पूर्ण झाले असते.” कास्टिंग काऊचमुळे अनेक चित्रपट नाकारल्याचा दावा पायलने या पोस्टमधून केला आहे. मात्र, काही वेळातच अभिनेत्रीने ही इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली.

हेही वाचा : “ओटीटीवर फक्त समलैंगिकता, गे-लेस्बियन सीरिज…”, ‘गदर २’च्या प्रमोशनदरम्यान अमीषा पटेलने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

पायलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. अनेकांनी तिचे समर्थन केले होते तर काही लोक तिच्याकडून सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. यापूर्वी २०२० मध्ये अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले होते. यानंतर पायल बरीच चर्चेत आली होती. अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत असते.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी जनतेची मागितली जाहीर माफी; म्हणाले, “मी हात जोडून…”

दरम्यान, ‘फायर ऑफ लव्ह रेड’ हा चित्रपट येत्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री पायल घोषबरोबर अभिनेका कृष्णा अभिषेकने प्रमुख भूमिका साकारली आहे.

Story img Loader