Actor Parvin Dabas Road Accident : अभिनेता परवीन डबासचा भीषण अपघात झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो आयसीयूमध्ये आहे. आज, शनिवारी (२१ सप्टेंबरला) सकाळी त्याचा अपघात झाला. इंडियन एक्सप्रेसने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “डॉक्टरांनी परवीनच्या काही चाचण्या केल्या आहेत. सध्या त्याच्याबरोबर त्याची पत्नी, अभिनेत्री प्रीती झांगियानी रुग्णालयात आहे.”

“या घटनेनंतर मी आणि माझे कुटुंब खूप घाबरलो आहोत. परवीनला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याला आणखी मार लागला आहे का, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर सीटी स्कॅन आणि इतर उपचार करत आहेत. सध्या फार काही सांगू शकत नाही. तो रात्री लीगच्या कामात व्यग्र होता आणि सकाळी कार चालवत असताना हा अपघात झाला,” अशी माहिती परवीन डबासची पत्नी प्रीती झिंगियानीने एबीपी न्यूजला दिली.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Actor and TVK President Vijay on Dr BR Ambedkar
Actor Vijay on Ambedkar: “आंबेडकरांचीही मान आज शरमेने खाली झुकली असती…”, तमिळ अभिनेता विजयचं मोठं विधान
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

Video: Bigg Boss Marathi 5 चा ग्रँड फिनाले अवघ्या १५ दिवसांवर? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

परवीन डबास प्रो पंजा लीगचा सह-संस्थापक आहे. या लीगने परवीनच्या अपघाताबद्दल निवेदन प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. “तुम्हाला कळवताना वाईट वाटतंय की प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वांद्रेतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वांद्रे येथे शनिवारी पहाटे त्यांचा कार अपघात झाला. घटनेचे सविस्तर तपशील लवकरच येतील. आता डबास यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत. प्रो पंजा लीग मॅनेजमेंट त्यांच्या प्रकृतीबद्दल लवकरच अपडेट देईल.”

“मी मनापासून प्रेम केलं,” विवेक ओबेरॉयचं वक्तव्य; म्हणाला, “माझ्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड्स…”

परवीन डबास ‘खोसला का घोसला’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. तसेच त्याने ‘रागिनी एमएमएस 2’ आणि ‘माय नेम इज खान’ या चित्रपटांत काम केलं होतं. तो नुकताच ‘मेड इन हेवन’ या प्राइम व्हिडीओच्या सीरिजमध्ये झळकला होता. परवीनने ‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री प्रीती झांगियानीशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत.

Story img Loader