चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत, जे ऑनस्क्रीन बोल्ड करण्यास नकार देतात. तसेच त्यांच्या काँट्रॅक्टमध्ये ‘नो किंसिंग’ पॉलिसी अशा गोष्टी असतात. अशाच प्रकारे आणखी एका अभिनेत्रीचं काँट्रॅक्ट असल्याचं समोर आलं आहे. ‘द फॅमिली मॅन’ सीरिजमधली अभिनेत्री प्रियमणिनं तिच्या काँट्रॅक्टमध्ये ‘नो किसिंग’, ‘नो बोल्ड सीन’ या पॉलिसी असल्याचं सांगितलं आहे. यामागचं कारणही तिनं नुकतंच स्पष्ट केलं आहे.

‘न्यूज 18’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रियमणिनं सांगितलं की, “ऑनस्क्रीन किस आणि बोल्ड सीन न करणं ही माझी पर्सनल चॉइस आहे. मी ऑनस्क्रीन किस करण्यासाठी नकार देते. फक्त गालावर किस करण्यास होकार देत. ही एक भूमिका असते हे मला ठाऊक आहे. परंतु वैयक्तिरित्या सांगायचं झालं तर, मला जर ऑनस्क्रीन कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला किस करायला लागली तर मला अवघडल्यासारखं वाटतं. शिवाय यामागचं कारण माझ्या नवऱ्याला द्यावं लागतं.”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

हेही वाचा – लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पोहोचले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात; व्हिडीओ समोर

हेही वाचा – केतकी चितळेच्या आयुष्यावर लवकरच प्रकाशित होणार पुस्तक, तुरुंगात जाण्याचा प्रवास उलगडणार

‘हिज स्टोरी’मध्ये मला अभिनेता सत्यदीप मिश्राबरोबर बोल्ड सीन करायचा होता. त्यावेळीही मला अवघडल्यासारखं झालं. मी म्हटलं, मी गालावर एक किस करेन. यापेक्षा अधिक गोष्टी करताना मला अवघडल्यासारखं होत. माझ्याकडे बरेच प्रोजेक्ट आले, ज्यामध्ये बोल्ड सीन होते. पण मी त्याला नकार दिला” असं प्रियमणिनं सांगितलं.

तसेच ती म्हणाली की, “जेव्हा माझा एखादा किस आणि बोल्ड सीन केलेला प्रोजेक्ट रिलीज होईल, तेव्हा तो प्रोजेक्ट माझं दोन्ही कुटुंब पाहिलं. आणि हे पाहून ते लोकं विचार करतील की, लग्न होऊनही आमची सून असं का करत आहे? इतर व्यक्ती तिच्यावर हात का टाकतं आहे? जरी ते लोकं असं माझ्यासमोर बोलले नाही, तरीही ही माझी पर्सनल चॉइस आहे. माझं हे काम आहे, हे त्यांना माहित आहे. पण मला अवघडल्यासारखं होऊ नये, असं माझं मत आहे.”

हेही वाचा – Video: गोष्ट पडद्यामागची- ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकामुळे पाकिस्तानात साजरी झाली दिवाळी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं…

दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनं ‘नो किसिंग’ पॉलिसी तोडल्याचं समोर आलं होतं. १८ वर्षांनंतर तमन्नानं ‘लस्ट स्टोरीज २’साठी ही पॉलिसी तोडल्याचं बॉयफ्रेंड विजय शर्मानं सांगितलं होतं.

Story img Loader