Priyanka Chopra : ‘दोस्ताना’, ‘क्रिश’, ‘डॉन’, ‘बिग ब्रदर’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘बर्फी’, ‘अग्निपथ’, ‘दिवाना मै दिवाना’, ‘गुंडे’, ‘मेरी कॉम’, ‘क्रिश ३’ या आणि अशा अनेक चित्रपटांतून चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिका अगदी लीलया पेलल्या आहेत. इतकंच नाही, ‘बर्फी’ चित्रपटातील तिच्या अभिनयाने ती एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे, असं तिने सर्वांना दाखवून दिलं आहे.
प्रियांकाचा ‘दोस्ताना’ चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. यात अभिषेक बच्चन व जॉन अब्राहमसह तिचं ‘देसी गर्ल’ हे गाणं तुफान गाजलं. आजही अनेक चाहते तिला देसी गर्ल म्हणून ओळखतात. या चित्रपटानंतर प्रियांका चाहत्यांसाठी देसी गर्ल झाली. आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चाहत्यांच्या घोळक्यातून तिला देसी गर्ल असं म्हणण्यात आलं. त्यावर तिने आणि तिचा पती निक जोनासने प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
हेही वाचा : लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार विवाहबंधनात! पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सेलिब्रिटी स्टायलिस्ट
प्रियांकाने नुकतीच पती निक जोनासबरोबर ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिचे आणि निकचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. त्यातील एका व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघेही पापाराझींसमोर उभे राहून सुंदर पोज देत फोटोशूट करत आहेत. एकत्र कॅमेऱ्यासमोर पोज देत असताना प्रियांकाचे काही चाहते तिला पाहतात. प्रियांकाला पाहताच चाहत्यांच्या घोळक्यातून “देसी गर्ल…”, या गाण्यातील शब्द गुणगुणतात.
चाहत्यांच्या घोळक्यातून हा आवाज ऐकू येताच निक प्रियांकाकडे पाहू लागतो आणि गोड स्माईल देतो. त्यावर प्रियांकाच्या ओठांवरसुद्धा हसू उमटतं. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात आणि पुन्हा पापाराझींना पोज देऊ लागतात. त्यांची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रियांका परदेशात असली तरी तिला आजही चाहते देसी गर्ल म्हणून ओळतात, हेच हा व्हिडीओ पाहून समजत आहे.
हेही वाचा : “कुबूल है”! ‘पंचायत’ फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…
प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यात तिच्यासह निकसुद्धा दिसत आहे. या पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाला मानद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अभिनेत्री सारा जेसिका पार्करच्या हस्ते प्रियांकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे सर्व फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “रेड सी फिल्म फेस्टिव्हलमधील सन्मानाबद्दल मनापासून धन्यवाद. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. मनोरंजन विश्वातील प्रत्येकाला एकत्र आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” असं लिहित तिने पुढे हात जोडलेले इमोजी पोस्ट केलेत.