बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून तिला ओळखले जाते. सध्या प्रियांका ही तिच्या आगामी सिटाडेल या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. येत्या २८ एप्रिलला हो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच प्रियांका चोप्राने बॉलिवूडची पुढची सुपरस्टार कोण असेल? याबद्दल सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा ही सिटाडेल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रियांका ही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी प्रियांकाला बॉलिवूडची आगामी काळातील सुपरस्टार कोण असेल असे विचारण्यात आले होते. यावेळी प्रियांकाने अभिनेत्री अलाया एफचे नाव घेतले.
आणखी वाचा : शाहरुखच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियांका चोप्राचा संताप, म्हणाली “डोक्यात हवा…”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

“मला अलाया फर्निचरवाला खूप आवडते. ती पूजा बेदी यांची मुलगी आहे. अलाया खूप मस्त आहे. तिची विचार करण्याची पद्धतही वेगळी आहे. तिला इतर अभिनेत्रींसारख अजिबात व्हायचं नाही. त्यामुळे ती बॉलिवूडची आगामी काळातील सुपरस्टार असू शकते”, असे मला वाटते.

“पण मी बरोबर आहे की नाही, हे मला येत्या काही वर्षात कळेलच”, असेही तिने यावेळी म्हटले. प्रियांका चोप्राच्या उत्तराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्यावर विविध कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “आता प्रियांकाने अलायाचे नाव घेतलं आहे, त्यामुळे आतातरी तिला चांगले चित्रपट मिळतील”, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे.

आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट

दरम्यान अलायाने सैफ अली खानबरोबर स्क्रीन शेअर करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलाया ही जवानी जानेमन या चित्रपटात दिसली होती. अलायाची भूमिका असलेला फ्रेडी हा चित्रपट चांगलाच गाजला. यात ती कार्तिक आर्यनबरोबर झळकली होती. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या काही दिवसांत अलाया ‘अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader