प्रियांका चोप्रा ही सध्या बॉलीवूडपासून लांब असली तरी नेहमीच चर्चेत असते. लग्न झाल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. हिंदी चित्रपटांबरोबरच हॉलीवूडमध्ये काम करत आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या मुलीवर ती अत्यंत चांगले संस्कार करत आहे हे तिच्या पोस्टमधून अनेकदा दिसतं. आता अशीच तिची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी प्रियांका आणि निक सरोगसीद्वारे आई-वडील झाले. त्यांची लेक मालती मेरीबद्दलच्या गोष्टी ते सोशल मीडियावरून अनेकदा शेअर करताना दिसतात. आता प्रियांकाने तिच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त तिच्या लेकीला भारतीय पोशाख परिधान केला. तर या वेळी मालती मेरीने तिच्या आजोबांना नमस्कारही केला.

आणखी वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

प्रियांका चोप्राच्या वडिलांचा नुकताच स्मृतिदिन झाला. यानिमित्त तिने तिच्या घरी एक पूजा ठेवली होती. या पूजेच्या वेळी तिने मालती मेरीला लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यामध्ये मालती मेरी खूप गोड दिसत होती. तिचे काही फोटो प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. एका फोटोमध्ये मालती मेरी लेहेंगा परिधान करून पूजासमोर मांडलेली फुलं उचलताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मालती आजोबांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिलं “मिस यू डॅड.”

हेही वाचा : “प्रियांकाने अनेक बॉलिवूड चित्रपट गमावले कारण…” मधू चोप्रा यांचा लेकीच्या करिअरबद्दल मोठा खुलासा

प्रियांकाने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत मालतीचा हा क्यूट अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. याचबरोबर मालतीवर चांगले संस्कार करत असल्यामुळे प्रियांका आणि निकचंही सर्व जण कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress priyanka chopra dresses up her daughter malti meri in indian style rnv