अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही विविध आघाड्यांवर कार्यरत आहे. अभिनेत्री म्हणून, व्यवसायिका म्हणून ती उत्तम कामगिरी करत आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यावर तिने न्यूयॉर्कमध्ये स्वतःचं ‘सोना’ हे रेस्टॉरंट सुरू केलं. आता तिने रेस्टॉरंबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. 

न्यूयॉर्क या शहरामध्ये दोन वर्षांपूर्वी तिने ‘सोना’ नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं. हे एक इंडियन रेस्टॉरंट आहे. आतापर्यंत अनेकदा तिने या रेस्टॉरंटबद्दलच्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या. या रेस्टॉरंटमधून तिची मोठी कमाईही होत होती. पण आता यापुढे ते रेस्टॉरंट प्रियांकाच्या मालकीचं असणार नाही.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bogie - Vogie Restaurant, Restaurant at Akurdi Railway Station, Pimpri , Akurdi ,
पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट
pune mahametro loksatta news
‘महामेट्रो’कडून हवाईप्रवाशांसाठी विशेष सुविधा, कसा होणार फायदा?
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार

आणखी वाचा : सफर प्रियांका चोप्राच्या न्यू यॉर्कमधील ‘सोना’ या रेस्टॉरंटच्या किचनची…

नुकताच प्रियांकाने ‘सोना’ रेस्टॉरंटवरील तिचा मालकी हक्क सोडला आहे. तर आता आहे रेस्टॉरंट त्याचे सह-संस्थापक मनीश के. गोयल हाताळत आहेत. या रेस्टॉरंटमध्ये प्रियांका अर्धी भागीदार होती. पण आता तिने ती भागीदारीही सोडली आहे. यापुढे हे रेस्टॉरंट मनीष गोयल सांभाळणार आहेत.

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

प्रियांकाने हा निर्णय का घेतला याचं कारण अजून समोर आलेलं नाही. पण तिला तिच्या हेअर कलर ब्रँड आणि प्रोडक्शन कंपनीकडे लक्ष द्यायचं असल्याने तिने ‘सोना’वरील मालकी हक्क सोडल्याचं बोललं जात आहे. तर प्रियांकाने ‘सोना’वरील हक्क सोडल्यानंतर मनीष गोयल यांनी या रेस्टॉरंट उभारणीमध्ये प्रियांकाने दिलेल्या योगदानाबद्दल तिचे आभार मानले आहेत. याचबरोबर “प्रियांका आता आमची क्रिएटिव्ह पार्टनर नाही पण ती ‘सोना’ कुटुंबाचा एक भाग असेल,” असं ते म्हणाले आहेत.

Story img Loader