बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी प्रियांका ही भारतात परतली. त्यानंतर तिने ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ च्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. तर दुसरीकडे प्रियांका ही तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच प्रियांकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या कामाच्या पद्धतीबद्दल सांगितले. तसेच ती तिच्या कामाचे निकष कसे ठरवते याबद्दलही तिने भाष्य केले.
प्रियांकाने नुकतंच तिचा सहकलाकार रिचर्ड मेडनबरोबर एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी तिला सिनेसृष्टीबद्दल, तिच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने मनमोकळेपणाने भाष्य केले.
आणखी वाचा : Video : प्रियांका चोप्रा-रणवीरचा डान्स पाहून शाहरुख खानच्या पत्नीने केलं असं काही…; व्हिडीओ व्हायरल
“गेल्या काही वर्षात माझे काम करण्याचे, चित्रपट निवडण्याचे निकष बदलले आहेत. कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना मी एका गोष्टीशी कधीही तडजोड करु शकत नाही आणि ती म्हणजे मला न आवडणाऱ्या व्यक्ती. मी माझ्या नावडत्या व्यक्तींबरोबर कधीही काम करु शकत नाही. माझ्यासाठी ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे”, असे प्रियांका म्हणाली.
“मला माझ्या आजूबाजूला असणाऱ्यांचे कौतुक करायला आवडते. मी हे फार उत्साहाने करते. मला कामावर जाण्यासाठी प्रेरणा देणारी लोक आवडतात. त्यामुळेच मी जेव्हा काही लोकांबरोबर काम करते, तेव्हा त्यांना भेटल्यावर त्यांच्या नोंदी ठेवते”, असे प्रियांकाने म्हटले.
आणखी वाचा : Video : भर पार्टीत दीपिका पदुकोणने केले ऐश्वर्या रायला किस, बेभान होऊन नाचतानाचा व्हिडीओ समोर
यावेळी प्रियांकाला तू वरुण धवन आणि समांथाला काय सल्ला देशील? असा प्रश्न विचारण्यात आला. “त्या दोघांना सल्ला देण्याची काही गरज आहे, असे मला तरी वाटत नाही. कारण ते दोघेही त्यांच्या पद्धतीने सक्षम कलाकार आहेत. मी नुकतीच वरुणला भेटले आणि त्यावेळी तो मला शूटिंग कसं चाललंय हे सांगत होता”, असेही प्रियांकाने सांगितले.