बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा उदयपूरच्या ‘द लीला पॅलेस’मध्ये २४ सप्टेंबरला पार पडला. या जोडप्याचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिणीतीची चुलत बहीण आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा या लग्नाला वैयक्तिक कामानिमित्त हजर राहू शकली नाही. त्यामुळे प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video: लग्नानंतर पहिल्यांदाच राघव चड्ढा व परिणीती चोप्रा आले माध्यमांसमोर, व्हिडीओ व्हायरल

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान

लग्नाला गैरहजर राहिल्यामुळे प्रियांकाने लाडकी बहीण परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यात अभिनेत्री लिहिते, “नवविवाहित जोडप्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर प्रेम! राघव चड्ढा तुमचं चोप्रा कुटुंबामध्ये स्वागत आहे. तिशा…तू फारचं सुंदर दिसत आहेस. तुला आणि राघवला माझ्याकडून खूप प्रेम आणि आशीर्वाद. एकमेकांची कायम काळजी घ्या आणि तुमच्या प्रेमाचं आयुष्यभर असंच रक्षण करा. लव्ह यू…परिणीती.”

हेही वाचा : “या देखण्या तरुणाच्या शेजारी तू…”, परिणीची चोप्राच्या भावाची बहिणीच्या लग्नानिमित्त खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

राघव-परिणीतीच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये खास तयारी करण्यात आली होती. चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी या नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी उदयपूरमध्ये उपस्थित होते. या जोडप्याच्या लग्नातील सुंदर फोटोंवर बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : एक दोन नव्हे तर परिणीती चोप्राचा रॉयल लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल ‘एवढे’ तास, मनीष मल्होत्राचा खुलासा ऐकून व्हाल थक्क

दरम्यान, कॉलेजमध्ये असताना परिणीती आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट झाली होती. परंतु, त्यांच्या प्रेम कहाणीला २०२२ पासून सुरूवात झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Story img Loader