अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांचा काल साखरपुडा संपन्न झाला. परिणीती-राघव यांचा साखरपुडा दिल्लीतील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला. या त्यांच्या साखरपुड्याला त्यांची जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. अमेरिकेत राहत असलेली प्रियांका चोप्रा देखील बहिणीच्या साखरपुड्याला आवर्जून हजर होती. आता या साखरपुड्यात प्रियांकाने नेसलेल्या साडीची खूप चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल सकाळी प्रियांका परिणीतीच्या साखरपुड्यासाठी भारतात दाखल झाली. तर संध्याकाळी तिने उत्साहाने बहिणीच्या साखरपुड्यात सहभाग घेतला. या साखरपुड्यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या साखरपुड्यासाठी प्रियांकाने खास साडी तयार करून घेतली होती.

आणखी वाचा : “प्रियांकाने अनेक बॉलिवूड चित्रपट गमावले कारण…” मधू चोप्रा यांचा लेकीच्या करिअरबद्दल मोठा खुलासा

परिणीती आणि राघवच्या साखरपुड्यात प्रियांका चोप्राचा लूक लक्ष वेधून घेत होता. या साखरपुड्याला तिने पिवळ्या रंगाची रफल्ड साडी नेसली होती. तर ब्लाऊजच्या ऐवजी तिने ऑफ-शोल्डर कॉर्सेट-नुमा टॉप परिधान केला होता. तिने नेसलेल्या या साडीची किंमत आता समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही तिची साडी ‘मिश्रू’ या ब्रँडची होती आणि या साडीची किंमत तब्बल ७८ हजार ७०० इतकी होती.

हेही वाचा : …आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

तर आता परिणीती व राघवच्या साखरपुड्याचे फोटो खूप चर्चेत आहेत. काल रात्री प्रियांकाने देखील त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत या भावी जोडप्याला शुभेच्छा दिल्या. प्रियांका जरी बहिणीच्या साखरपुड्यासाठी भारतात आली असली तरीही तिच्याबरोबर तिची लेक मालती मेरी कुठेही दिसली नाही. त्यामुळे प्रियांका आपल्या मुलीला अमेरिकेलाच ठेवून आली आहे, असे सर्वजण म्हणत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress priyanka chopra wore expensive saree on pariniti chopra engagement rnv