Actress Radhika Apte Welcomes Baby Girl: मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे आई झाली आहे. राधिकाने तिच्या बाळाबरोबरचा फोटो शेअर करून चाहत्यांशी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. राधिकाने तिच्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. राधिकाचं बाळ एका आठवड्याचं झालं आहे.
राधिका आपटे लग्नानंतर १२ वर्षांनी आई झाली आहे. दोन महिन्यापूर्वी तिने बेबी बंप फ्लाँट करून तिच्या घरी नवीन सदस्याचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. आता तिने बाळाबरोबरचा फोटो शेअर करत प्रसूतीनंतर ती कामावर परतली आहे, अशी माहिती दिली. राधिकाला मुलगी झाली आहे. राधिकाने पोस्टच्या हॅशटॅगमध्ये ‘its a girl’ असं लिहिलं आहे.
राधिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लॅपटॉपसमोर बसलेली दिसत आहे. तर तिच्या कुशीत तिची लेक आहे. तिने दिलेल्या कॅप्शनुसार तिचं बाळ एका आठवड्याचं झालं आहे. लेकीच्या जन्मानंतर पहिली वर्क मीटिंग अशा आशयाचं कॅप्शन देत राधिकाने फोटो पोस्ट केला आहे.
पाहा राधिकाने शेअर केलेला फोटो-
राधिका तिचं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवते. राधिकाने तिच्या लग्नाची माहितीही बराच काळ लपवून ठेवली होती. तिने वर्षभर डेट केल्यावर २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली होती. आता राधिका व बेनेडिक्ट दोघेही एका गोंडस बाळाचे आई-बाबा झाले आहेत.