बॉलीवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार झाले ज्यांना एक चित्रपट किंवा गाण्यातून खूप लोकप्रियता मिळाली. पण त्यांचं करिअर पुढे सरकलं नाही आणि मग ते अचानक सिनेसृष्टीपासून दुरावले गेले. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री होती, जिला एका गाण्यामुळे बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. आपल्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीचं करिअर फार चांगलं राहिलं नाही. वैयक्तिक आयुष्यातही तिला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ वर्षांपूर्वी पंकज उधास यांचं ‘चुपके चुपके सखियों से वो’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यात जॉन अब्राहमबरोबर मराठमोळी राजलक्ष्मी खानविलकर झळकली होती. या गाण्याने या दोन्ही कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळाली. राजलक्ष्मीच्या सौंदर्याने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या म्युझिक व्हिडीओतून लोकप्रियता मिळाल्यावरही राजलक्ष्मीला बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही. राजलक्ष्मी तिच्या चित्रपट करिअरपेक्षा व अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. १९९६ मध्ये ‘कॅडबरी’ च्या जाहिरातीदरम्यान तिची भेट मॉडेल व अभिनेता समीर सोनीशी भेट झाली. नंतर त्यांची मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि दोघांनी लग्नगाठ बांधली. पण दुर्दैवाने त्यांचं लग्न फक्त सहा महिने टिकलं आणि त्यांचा घटस्फोट झाला.

‘F**k off’ म्हणत मिथुन चक्रवर्तींच्या मुलाला सलमान खानने दिशा पाटनीसमोर दिलेला दम, नमाशी खुलासा करत म्हणाला…

एका मुलाखतीत समीर सोनीने त्याच्या व राजलक्ष्मीच्या घटस्फोटाबाबत सांगितलं होतं. त्याच्या पहिल्या चित्रपटाचं प्रिमियर ज्या रात्री होतं, त्याच रात्री आपला घटस्फोट झाला होता, असा खुलासा त्याने केला होता. “ती रात्र मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासाठी ती खूप त्रासदायक रात्र होती. माझ्या वैयक्तिक जीवनात वादळ आलं होतं. खरं तर मला घटस्फोट घ्यायचा नव्हता. कारण आमच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले होते, त्यामुळे नात्याला वेळ द्यावा असं मला वाटत होतं,” असं समीर म्हणाला होता.

पाच वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा अभिनेता ठेवतोय रोजे, म्हणाला, “पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास…”

समीर सोनीने नंतर अभिनेत्री नीलम कोठारीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे. समीर सोनीपासून घटस्फोट झाल्यानंतर राजलक्ष्मीने २००० साली ‘आशिकी’ फेम राहुल रॉयशी लग्न केलं. पण दोघांचा १४ वर्षांच्या संसारानंतर २०१४ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर राजलक्ष्मी खानविलकर आता कुठे आहे आणि ती काय करत आहे याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rajlaxmi khanvilkar ex wife of samir soni and rahul roy chupke chupke sakhiyon se woh viral song hrc