अभिनेत्री राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा पती आदिल खान दुर्रानी सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून जामीनावर सुटलेल्या आदिलने त्याच्या वकिलाबरोबर पत्रकार परिषद घेत राखीवर गंभीर आरोप केले. यावेळी राखीने माझे न्यूड व्हिडीओ बनवले, तिने ड्रग्ज दिले, असं आदिल म्हणाला होता. त्यावर आता राखीने स्पष्टीकरण दिले.
नुकतंच राखी सावंतने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राखीने आदिलने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आदिल खान दुर्रानी राखी सावंतसाठी जेलमध्ये राहिलेला नाही, असे राखी यावेळी म्हणाली.
आणखी वाचा : “मला नवरा हवाय, पण माझ्या दोन्हीही मुलींना…”, वयाची ४५ शी ओलांडलेल्या सुश्मिता सेनने केला लग्नाबद्दल खुलासा, म्हणाली “माझे वडील…”
“आदिल खान ६ महिने जेलमध्ये राहून आला. पण तो माझ्यासाठी जेलमध्ये गेलेला नाही. राखी सावंतसाठी तो जेलमध्ये राहिलेला नाही. त्याच्या इराणी गर्लफ्रेंडने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, त्यामुळे तो माझ्यासाठी गेलेला नाही”, असे राखी म्हणाली.
“मला त्याने मारहाण केली. माझ्यावर अत्याचार केले. तो माझ्याच घरात दुसऱ्या मुलींसोबत सेक्स करायचा, हे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. मला दुबईत, मुंबईत मारण्याचा प्रयत्न झाला. आदिल ६ महिने त्याच्या गर्लफ्रेंडवर बलात्कार करत होता. त्याची गर्लफ्रेंड ५ वर्षे त्याच्याबरोबर होती. त्याने माझ्याशी लग्न केलंय, हे तिला माहिती नव्हते. तो त्याच्या गर्लफ्रेंडशी खोटं बोलला. मलाही खोटं सांगितलं. ती माझी मैत्रीण आहे, असे मला सांगितलं”, असेही राखीने यावेळी सांगितले.
आणखी वाचा : “तुझा पहिला पगार किती रुपये होता?” सुश्मिता सेन म्हणाली…
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात राखीने पती आदिल खानवर मारहाणीचे व फसवणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर म्हैसूरमधील एका तरुणीनेही अत्याचाराचा आरोप केला होता. दोन्ही प्रकरणात आदिल गेले सहा महिने तुरुंगात होता. आता जामीन मिळाल्यानंतर तो राखीने त्यावेळी केलेल्या आरोपांना उत्तर देत नवनवीन खुलासे करत आहे.