बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या सातत्याने प्रसिद्धीझोतात आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विविध खुलासे करताना दिसत आहे. राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीविरोधात तक्रार केली होती. आदिलने मारहाण केल्याचा आरोप राखीने केला आहे. राखीचा पती आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. त्यानंतर आता राखीने तिच्या सोशल मीडियावरुन आदिलचे जुने व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
राखी सावंतने ही सोशल मीडियावर सक्रीय असते. राखीने काही तासांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी ही आदिलला मिठी मारुन उभी असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओ आदिल हा काही तरी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राखी ही त्याला किस करताना दिसत आहे. राखीने त्या दोघांचा हा जुना व्हिडीओ पुन्हा पोस्ट केला आहे. या व्हिडीओखाली राखीने हार्ट ब्रेक असणारा इमोजीही शेअर केला आहे.
आणखी वाचा : “चुकीच्या मार्गाने…” राखी सावंतने पती आदिल खानकडून मागितली दीड कोटींची रक्कम
या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक गाणं वाजताना दिसत आहे. “आता मी कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही, मी तुझा तिरस्कार करते. तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणांचा मी तिरस्कार करते आणि स्वत:चाही”, असे बॅकग्राऊंड म्युझिक वाजताना दिसत आहे. त्यानंतर ‘टुट कर प्यार करे जो…’ असे एक गाणंही ऐकायला येत आहे.
राखीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहेत. “आता आदिलला जेल झालीय ना, मग कशाला त्याच्या नावाच्या पोस्ट करत आहेस. रात्र झाली आहे शांत झोप जा”, असा सल्ला एका नेटकऱ्याने तिला दिला आहे. तर एकाने “या गोष्टी तू का पोस्ट करतेस”, असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने “देव तुमच्यातील सर्व समस्या दूर करेल”, असे म्हटले आहे.
आणखी वाचा : राखी सावंतने आदिलची मारहाण का सहन केली? खुलासा करत म्हणाली “माझ्या आईमुळे…”
दरम्यान, राखी सावंत व तिचा पती आदिल खान यांच्यात वाद झाला आहे. आधी लग्न स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आदिल खानने नंतर मारहाण केल्याचे आरोप राखीने केले, तसेच त्याचे अफेअर असल्याचंही तिने सांगितलं. त्यानंतर मारायला घरी आलेल्या आदिलबद्दल तिने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर आदिल खानला अटक झाली. त्यानंतर त्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.