अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने पती आदिल खानचं अफेअर असल्याचा खुलासा केला होता. आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता आदिल तुरुंगात आहे.
राखीने आदिल खानबरोबर मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. लग्नासाठी धर्म बदलल्याचा खुलासाही राखीने केला होता. मुस्लीम धर्म स्वीकारत नावही बदलून फातिमा केल्याचं राखी म्हणाली होती. आदिलला अटक झाल्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे होत राखीचे अनेक व्हिडीओही समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच राखीने आदिल खानबरोबरचा बेडरुममधील व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता राखीने नमाज पठण करतानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हेही वाचा>> ‘बिग बॉस’ विजेता एमसी स्टॅनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडून मिळाली ऑफर
हेही वाचा>> सत्यजीत तांबेंनी शेअर केला ओंकार भोजनेच्या कवितेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले “मित्रा…”
राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने नाईट सूट घातल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवरुन राखीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. “या कपड्यांमध्ये नमाज पठण करत नाहीत”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “नाईट सूटमध्ये नमाज पठण करू नकोस” असं म्हटलं आहे. राखीच्या नेलपेंटवरुनही अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “नमाज करताना नेलपेंट काढायची असते”, असं एकाने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “मोठी नखं ठेवू शकता पण नमाज पठण करताना नेलपेंट लावायची नसते” अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा>> शिव ठाकरेला मुंबईत खरेदी करायचं आहे घर, म्हणाला “त्याशिवाय मला सेलिब्रिटी…”
राखीने आदिलवर फसवणूक व मारहाण केल्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिल खानला अटक केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी(२० फेब्रुवारी) पुन्हा आदिलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.