गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये विविध धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होताना पाहायला मिळत आहे. यातील अनेक चित्रपट हे लैंगिक समस्या, महिलांना येणारी मासिक पाळी, महिलांचे आरोग्य यावर आधारित आहे. त्यानंतर नुकताच लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘छत्रीवाली’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने एक बोल्ड वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रकुल प्रीत ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच तिचा ‘छत्रीवाली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लैंगिक शिक्षण आणि कंडोम याबद्दल स्पष्टपणे मत मांडले.
आणखी वाचा : Video : ‘तारक मेहता…’ मालिकेतील दयाबेनचा नवा व्हिडीओ समोर, अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

“छत्रीवाली हा चित्रपट लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा चित्रपट आहे. ज्या विषयावर सहसा लोक कमी बोलतात. आपल्याकडे आजही लैंगिक शिक्षणासारख्या विषयाला फार महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे या विषयाचे ज्ञान देण्यासाठी आपण जितके चित्रपट काढू तितके कमीच आहे. काही लोक तर यावर बोलणंही टाळतात.

खरं सांगायचं तर आजही आपल्या देशात केवळ ५ टक्के लोक कंडोमचा वापर करतात. याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे जर आपणच आपल्या घरातील आणि देशातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही, तर आपण कुठेतरी चुकतोय, हे प्रत्येकाला समजायला हवं. यासंदर्भात जास्त लोकांना माहिती नाही. कोणालाही प्रोटेक्शन वापरायचं नाही, असं नाही. पण अपुरी माहिती असल्याने सगळं चुकतं. काही महिलांना देखील याविषयाचं सखोल ज्ञान नाही. ज्याची खरंतर फार गरज आहे”, असे रकुल प्रीत सिंग म्हणाली.

आणखी वाचा : “तेजस्वीने इतक्या कमी वयात…” दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर करण कुंद्राच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान छत्रीवाली या चित्रपटात रकुल प्रीतबरोबर सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलूवालिया, राजेश तेलंग, प्राची शाह पांड्या, राकेश बेदी आणि रीवा अरोरा हे कलाकारही झळकताना दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवस्कर यांनी केलं आहे. हा चित्रपट सोमवारी २० जानेवारी रोजी ‘झी 5’वर प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rakul preet singh said only 5 percent people using condoms nrp