Rashmika Mandanna Reaction on Fake Viral Video : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह कलाकार व चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच आता अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बनावट व्हिडीओ व्हायरल, अमिताभ बच्चन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

रश्मिकाने लिहिलं, “माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे.
एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत. पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही. इतर अनेक जण अशा प्रकरणाला बळी पडण्यापूर्वी आपण याचा एक समाज म्हणून निषेध करायला पाहिजे,” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विश्लेषण: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

रश्मिका मंदानाची पोस्ट

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. हा व्हिडीओ रश्मिका मंदानाचा नसून झारा पटेलचा आहे. झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rashmika mandana reaction on her fake viral video hrc