अभिनेत्री रवीना टंडन ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षं ती तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आली आहे. तिच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत आली. रवीना टंडन व अक्षय कुमार यांचं अफेअर हा एके काळी हॉट टॉपिक होता. आता अनेक वर्षांनी यावर तिने मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एके काळी बॉलीवूडमधील टॉपची जोडी असलेल्या रवीना टंडन व अक्षय कुमारच्या अफेअरची खूप चर्चा होती. ही दोघं बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यांनी साखरपुडाही केला होता. पण नंतर काही कारणाने त्यांचं लग्न मोडलं. यानंतर दोघांनी आपापला मार्ग बदलला. आता अक्षय कुमारबरोबर रवीनाचं नातं कसं आहे, याचा तिने स्वतः खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

नुकत्याच ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रवीना म्हणाली, “अक्षय आणि मी एकमेकांचा खूप आदर करतो. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. अजूनही आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत. प्रत्येकाचा आपला असा एक प्रवास असतो आणि आपण त्याचा मान राखून पुढे जायचं असतं. अक्षय हा आपल्या मनोरंजनसृष्टीचा भक्कम आधार आहे असं मला वाटतं.”

हेही वाचा : Video: “२३-२४ वर्षांच्या मुलींबरोबर…” मौनी रॉय व सोनम बाजवाबरोबर शर्टलेस होऊन नाचल्याने अक्षय कुमारवर संतापले नेटकरी

दरम्यान, १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात अक्षय व रवीना यांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केला होता. यानंतर ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘बारूद’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं होतं. रवीनाशी ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने ९० च्या दशकाच्या अखेरीस ट्विंकल खन्नाशी साखरपुडा केला आणि २००१ मध्ये ते दोघं विवाहबंधनात अडकले. तर रवीनाने २००४ साली अनिल थडानीशी लग्न केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress raveena tandon opens up about her relation with akshay kumar said they are friends rnv