बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) यांचं एकेकाळी एकेकांवर प्रेम होतं हे सर्वश्रूत आहे. रेखा अनेकदा बच्चन यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात, त्यांच्याबद्दल बोलत असतात. आता रेखा यांनी बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबाबत वक्तव्य केलं आहे. रेखा हा शो पाहतात आणि त्यातील बच्चन यांचा एकेक संवाद आपल्याला लक्षात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेखा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावणार आहेत. इथे त्या त्यांच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल बोलताना दिसतील. शोमधील काही क्लिप्स व्हायरल होत आहेत. या एपिसोडमध्ये कपिलने अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये पाहुणा म्हणून जाण्याचा एक विनोदी किस्सा शेअर केला.

हेही वाचा – अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

कपिलने सांगितला किस्सा अन् रेखा म्हणाल्या…

कपिल म्हणाला, “आम्ही बच्चन साहेबांबरोबर केबीसी खेळत होतो तेव्हा माझी आई समोरच्या रांगेत बसली होती.” अमिताभ बच्चन यांची नक्कल करत कपिल पुढे म्हणाला, “त्यांनी तिला विचारले, ‘देवी जी, क्या खा के इसको पैदा किया?” कपिलने त्याच्या आईने दिलेले उत्तर सांगितलं. आई “दाल-रोटी” म्हणाली. कपिलचं बोलणं संपण्याआधी रेखा म्हणाल्या, “मला विचार ना. मला त्यांचा एकेक डायलॉग लक्षात आहे.”

हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

रेखा यांनी यापूर्वीच्या एका मुलाखतीत त्यांना अभिनेत्री म्हणून आकार देण्याचं श्रेय अमिताभ बच्चन यांना दिले होते. “अभिनेत्री म्हणून मी जे काही आहे, त्यासाठी मी त्यांची १०० टक्के ऋणी आहे. मी त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांनी जे सांगितलं तसंच केलं,” असं रेखा म्हणाल्या होत्या.

हेही वाचा – “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा? म्हणाला, “शेवटचे दोन चित्रपट अन्…”

दरम्यान, ‘Rendevouz with Simi Garewal’ या खास चॅट शोमध्ये सिमी यांनी रेखा यांना थेट अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? असा प्रश्न केला होता. “अर्थात, आजपर्यंत मला एकही पुरुष, स्त्री, लहान मूल किंवा वृद्ध माणूस सापडला नाही जो त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत नाही, मग माझं प्रेम कसं नसेल?” असं रेखा या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rekha reveals she watches amitabh bachchan kaun banega crorepati show hrc