अभिनेत्री रेखा या बॉलीवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. गेली अनेक दशकं त्या त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आल्या आहेत. गेली दहा वर्षं त्या मोठ्या पडद्यापासून दूर होत्या. या दहा वर्षांमध्ये त्या कोणत्याही चित्रपटामध्ये झळकल्या नाहीत. आता त्यांनी या मागचं कारण स्पष्ट केलं आहे.

रेखा शेवटच्या २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुपर नानी’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. पण त्यानंतर त्यांनी एकही चित्रपट साईन केला नाही. रेखा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात, पण तरी त्या मोठ्या पडद्यापासून दूर होत्या. आता नुकतीच त्यांनी एका मासिकाला मुलाखत दिली आणि गेली दहा वर्षं चित्रपट साईन न करण्याचं कारण सांगितलं.

आणखी वाचा : Video: गोष्ट पडद्यामागची- अभिनेत्री रेखा यांचं मुकेश यांच्याशी झालेलं लग्न का झालं अयशस्वी? घ्या जाणून

त्या म्हणाल्या, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण मला जे काही आवडतं ते निवडण्याचा मला अधिकार मिळाला आहे. याचबरोबर मला विचारणा करण्यात आलेल्या काही प्रोजेक्ट्सना नाही म्हणण्याचाही अधिकार आहे आणि म्हणूनच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी चित्रपटांत काम केलं किंवा नाही केलं तरीही माझं सिनेमॅटिक व्यक्तिमत्त्व कधीच माझी साथ सोडत नाही. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा योग्य प्रोजेक्ट मला मिळेल. मी कुठे असलं पाहिजे किंवा कुठे नाही हे मी स्वतः निवडते.”

हेही वाचा : “मी बीफ खायचो पण…,” विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा, म्हणाले…

दरम्यान, रेखा आता लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेचं नाव ‘गुम है किसी के प्यार में’ असं आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

Story img Loader