गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने, अभिनयनाने आणि नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रेखा, सुरवातीला दाक्षिणात्य चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रेखा यांचे बॉलिवूडमधील करियर जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांचे खासगी आयुष्यदेखील कायम चर्चेत चर्चेत राहिले. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करियरची सुरवात केली होती. त्यांच्या खासगी आयुष्यातील व्यक्तींची नेहमीच चर्चा होते त्यातील एक व्यक्ती म्हणजे त्यांची सेक्रेटरी फरजाना, जवळपास ३४ वर्ष ती रेखा यांच्याबरोबर आहे.
रेखा कोणत्याही लग्न-समारंभात गेल्या तर फरजाना त्यांच्याबरोबर असते. फरजाना रेखांबरोबर संसदेत दिसली आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार फरजाना ही पहिली हेअरस्टाइलिस्ट होती. त्यानंतर रेखा यांना भेटल्यावर तिने त्यांचे काम सांभाळण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ती त्यांच्याबरोबर सावलीसारखे राहते. फरझानाचा लूक आणि ड्रेस पुरुषांसारखाच आहे. लेखक मोहनदीप यांच्या ‘युरेखा’ या पुस्तकातही रेखा आणि फरजाना यांच्या नात्याबद्दल लिहिल्याचं म्हटलं जातं. प्रसिद्ध प्रत्रकार मेघा संघवी यांनी असं म्हंटल होत की ‘फरजाना रेखासाठी उत्तम आहे. तिची उत्तम मैत्रीण आहे, मार्गदर्शन करणारी आहे तिला पाठिंबा देणारी आहे. रेखा तिच्यशिवाय जगूच शकत नाही’.
मनसेकडून ‘स्टार नेटवर्क’ला ४८ तासांचा अल्टीमेटम; जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय
रेखा यांचं वैयक्तिक जीवन फारच गूढ होतं, वैवाहिक सुख त्यांना कधीच मिळालं नसलं तरी पडद्यावर मात्र बच्चन, राज बब्बर, विनोद मेहरा ते थेट अक्षय कुमारपर्यंत कित्येक कलाकारांबरोबर त्यांच्या केमिस्ट्रिची खूप चर्चा झाली. रेखा यांनी आपल्या ‘उमराव जान’, ‘इजाजत’, ‘खूबसूरत’, ‘सिलसिला’, ‘मिस्टर नटवरलाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.