बॉलिवूड अभिनेत्री रेखा सौंदर्याच्या बाबतीत आजही आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा त्यांच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत राहिल्या होत्या. त्या काळी अभिनेत्री रेखा यांचं नाव सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं गेलं होतं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा तर बऱ्याच झाल्या होत्या मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं दोघांनी नेहमीच टाळलं होतं. पण एका मुलाखतीत रेखा यांना अमिताभ यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खूपच स्पष्ट उत्तर दिलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “बेवफा…”; IPL मध्ये गुजरात संघ हारताच जल्लोष केल्याने सारा अली खान ट्रोल; शुभमन गिलंच नाव घेत नेटकरी म्हणाले…

पण आश्चर्याची गोष्ट तेव्हा घडली जेव्हा रेखा यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांच्याबरोबर त्यांचे वैयक्तिक संबंध नसल्याचा खुलासा केला. रेखा यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना बिग बी वेड्यासारखे आवडतात, पण त्यांचा अभिनेत्याशी तसा कोणताही संबंध नाही. काही वर्षांपूर्वी सिमी ग्रेवालला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी खुलासा केला होता की, ‘माझे त्यांच्याशी कधीही वैयक्तिक संबंध नव्हते, हे सत्य आहे. एक अभिनेता म्हणून मला ते खूप आवडतात. मी त्यांच्यावर प्रेम करते हे खंर आहे, जगभरातील प्रेमींपेक्षा, हे प्रेम कसले आहे या प्रेमाची मी व्याख्या करू शकत नाही.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शनावरून मॉरिशसमध्ये गोंधळ; चित्रपटगृह बॉम्बने उडवून देण्याची ISIS समर्थकांची धमकी

या मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले होते. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे त्यांचे आणि जया बच्चन यांच्यातील संबंध बिघडल्याचे म्हटले जात होते. परंतु या मुलाखतीत रेखा यांनी स्पष्ट केले होते की त्या जया बच्चन यांचा खूप आदर करतात आणि दोघांमध्ये चांगले संबंध आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rekha talk about her relationship with amitabh bachchan dpj