९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रेणुका शहाणे यांना ओळखलं जातं. ‘सुरभि’ कार्यक्रम आणि ‘हम आपके है कौन’ या चित्रपटामुळे त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. अभिनेत्रीने २००१ मध्ये आशुतोष राणा यांच्याबरोबर लग्न केलं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्नादरम्यान घडलेला एक किस्सा जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रेणुका शहाणे : मनमोहक हास्याने भुरळ घालणारी ‘सुरभि’ ते माधुरी दीक्षितची लाडकी ‘शहाणी’

आशुतोष राणा यांच्या मध्य प्रदेशातील गावी दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. दोघांची ओळख १९९८ मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनाही २००१ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. गोव्यात चित्रीकरण करताना आशुतोष राणा यांनी रेणुका यांना एक कविता ऐकवली होती यामध्ये त्यांनी नकार, शांतता आणि एकटेपणा या गोष्टींचा उल्लेख केला होता. ही कविता ऐकल्यावर अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली होती. २५ मे २००१ रोजी आशुतोष आणि रेणुका यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नात घडलेला मजेशीर किस्सा अभिनेत्रीने अनेकदा सांगितला आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, वनिता खरात आणि ओंकार भोजने पुन्हा एकत्र, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

रेणुका शहाणे सांगतात, “मी जेव्हा पहिल्यांदा यांच्या गावी गेले तेव्हा स्टेशनवर जवळपास हजार ते दीड हजार लोकांचा जमाव आमच्या स्वागतासाठी उभा होता. ज्या हॉटेलमध्ये आमच्याकडच्या मंडळींची राहण्याची व्यवस्था केली होती त्या हॉटेलचं उद्घाटनच माझ्या हस्ते झालं होतं.”

लग्नाच्या ठिकाणी लाईट नसल्याने अभिनेत्रीने अंधारात लग्नाचा मेकअप केला होता. दोघांच्या लग्नात एवढी गर्दी झाली होती की, अभिनेत्रीचे आईवडीलसुद्धा मंडपापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे रेणुका यांच्या नणंदेने त्यांचं कन्यादान केलं होतं.

हेही वाचा : “मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा निरागस अंदाज अन् भारावून टाकणारी दृश्य, ‘नाळ २’चा टीझर प्रदर्शित

दरम्यान, गेली २२ वर्ष रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं आहेत. रेणुका-आशुतोष यांची जोडी प्रेक्षकांमध्ये आजही तेवढीच लोकप्रिय असून दोघांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress renuka shahane and ashutosh rana wedding story sva 00