मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित यांनी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. अलीकडेच अभिनेत्री रेणुका शहाणेंनी ‘सोनी मराठी’वरील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर अभिनेता अमेय वाघबरोबर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ‘हम आपके है कौन’च्या सेटवरील काही आठवणी सांगितल्या.

हेही वाचा : “ओटीटीवर फक्त समलैंगिकता, गे-लेस्बियन सीरिज…”, ‘गदर २’च्या प्रमोशनदरम्यान अमीषा पटेलने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

रेणुका शहाणे म्हणाल्या, “‘हम आपके है कौन’ सेटवर मला माधुरीने फार सांभाळून घेतले. जेव्हा आमचे पहिले आऊटडोअर शूटिंग होते, तेव्हा महिलांना बाहेर शूट असल्यावर सुविधा उपलब्ध व्हायच्या नाहीत. सेटवर स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने आम्ही मुली दिवसभर पाणीच प्यायचो नाही. ‘जर दिवसभर पाणी नाही प्यायलीस तर तुझ्या स्किनची कशी वाट लागेल याचे उदाहरण तुझ्यासमोर आहे’ असे तिने मला तिच्या चेहऱ्याकडे हात करून सांगितले. कारण, माधुरीला स्किनचा प्रचंड त्रास व्हायचा.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी जनतेची मागितली जाहीर माफी; म्हणाले, “मी हात जोडून…”

रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या, “माधुरीने मला कायम सेटवर स्वत:च्या बाजूला बसवायची. लोकांबरोबर ओळख करून द्यायची. मला सेटवर कायम शहाणी म्हणून ती हाक मारायची. तिचे कायम ‘शहाणी इकडे ये…शहाणी’ असे सुरु असायचे. तिच्यामुळे मला ‘हम आपके है कौन’ सेटवर फार छान वाटायचे आणि माधुरीने माझी प्रचंड काळजी घेतली.”

हेही वाचा : “बाळासाहेबांचं ते स्वप्न अपूर्णच”, नितीन गडकरींचा खुलासा; म्हणाले, “त्यांच्या निधनाआधी मी रुग्णालयात भेटल्यावर…”

दरम्यान, ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तसेच रेणुका शहाणे यांनी चित्रपटात माधुरीच्या बहिणीची भूमिका केली होती.