बॉलिवूडमध्ये आज नवनवीन चेहरे येताना दिसून येत आहेत. नवोदित अभिनेत्रींनी अगदी काही चित्रपटांमधून आपले बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे रिचा चड्ढा. नुकतेच तिने अभिनेता अली फजलबरोबर लग्न केले आहे. दोघांनी बॉलिवूडच्या लोकांसाठी स्वागत समारंभ सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित होते. रिचा चड्ढाने आपल्या उत्तम अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र याच अभिनेत्रीला हृतिक रोशनच्या आईची भूमिका विचारली गेली होती.
हृतिक रोशनचा ‘अग्निप’थ चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जुन्या ‘अग्निपथ’ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात त्याच्या आईची भूमिका तितकीच महत्वाची होती या भूमिकेसाठी रिचा चड्ढाला विचारण्यात आले होते तेव्हा या अभिनेत्रींचे अवघे २४ होते. चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरला तिने विचारले ‘अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मला का विचारत आहात’? त्यावर कास्टिंग डायरेक्टरने उत्तर की ‘गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटात तू नवाझच्या आईची भूमिका केली तुला ही भूमिका विचारत आहोत’. साहजिकच तिने या भूमिकेसाठी नकार दिला होता. या चित्रपटात झरीना वहाब यांनी हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. रिचा चड्ढाने मागे एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. ती पुढे म्हणाली होती ‘मला हृतिकच्या आईची भूमिका विचारणं हा मूर्खपणा आहे’.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचे ८०० भाग पूर्ण, लेखिकेने शेअर केली खास पोस्ट
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी बच्चनजींच्या आईची भूमिका साकारली होती. हृतिकच्या ‘अग्निपथ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मराठमोळे संगीतकार अजय अतुल यांनी या चित्रपटातला संगीत दिले होते. या चित्रपटात हृतिकच्या बरोबरीने संजय दत्त,ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
रिचा चड्ढाचा जन्म अमृतसरचा आहे, दिल्लीत तिने अनेक छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम केले आहे. ‘ओय लक्की लक्की ओय’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘मसान’, ‘सरबजीतसारख्या’ चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ‘इन्साईड’ इज सारख्या वेब सीरिजमध्ये ती आपल्याला दिसली आहे.