Richa Chadha and Ali Fazal Welcomed their First Child : रिचा चड्ढा व अली फझल यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालेलं आहे. दोन दिवसांआधी म्हणजेच १६ जुलैला अभिनेत्रीने तिच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. यासंदर्भात निवेदन जारी करत या जोडप्याने माहिती दिली आहे.

रिचा चड्ढा व अली फझल यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीला १६ जुलैला गोंडस अशा मुलीला जन्म दिला. “१६ जुलै २०२४ रोजी आमच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. आमचं कुटुंब प्रचंड आनंदी आहे. आम्ही आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कायम आभारी आहोत”

Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Deepika Padukone at Diljit Dosanjh Concert (1)
Video: लेकीच्या जन्मानंतर माहेरी आहे दीपिका पादुकोण, कॉन्सर्टमध्ये दुआच्या आईला पाहून दिलजीत म्हणाला…
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

हेही वाचा : Stree 2 Trailer : चंदेरी नगरीत सरकटे भूताची दहशत, श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

रिचा चड्ढा व अली फझल झाले आई-बाबा ( Richa Chadha and Ali Fazal )

रिचा व अली यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. या जोडप्याने १+१ = ३ असं कॅप्शन लिहिलेला एक फोटो शेअर केला होता. रिचा व अली यांनी २०१५ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. यानंतर २०१७ मध्ये या दोघांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. या जोडप्याने २०२० मध्ये स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत लग्न केलं होतं. यानंतर २०२२ मध्ये या जोडप्याने लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाने भरजरी लेहेंग्याऐवजी लग्नात साडी का नेसली? घरीच का बांधली लग्नगाठ? म्हणाली, “झहीर आणि मला…”

रिचा चड्ढाने( Richa Chadha and Ali Fazal ) यापूर्वी १४ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत बाळाच्या आगमनासाठी प्रतीक्षा करत असल्याचं म्हटलं होतं. “आम्ही नकारात्मकतेवर मात करणारं, करुणा व सहानुभूती असलेलं आणि सर्वांना भरभरून प्रेम देणारं बाळ या जगात आणू अशी आम्हाला आशा आहे. आमेन!” असं रिचाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

richa chadha
रिचा चड्ढा व अली फझल ( Richa Chadha and Ali Fazal)
Richa Chadha and Ali Fazal

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर ‘या’ सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने बनवला चित्रपट, अमिताभ बच्चन यांनी दिला आवाज

दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रिचा नुकतीच संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ मध्ये झळकली होती. तर अली फझल प्रमुख भूमिकेत असलेली ‘मिर्झापूर ३’ सीरिज नुकतीच ५ जुलै रोजी प्रदर्शित झाली आहे.

Story img Loader