बॉलिवूडमधील अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध असतात. कधी फोटोशूट तर कधी अभिनेत्यांनाबरोबर लिंकअपकच्या चर्चा. अभिनेत्री आणि पत्रकार यांचे एक वेगळे नाते आहे. तापसी पन्नू जया बच्चन या अभिनेत्रींचे पत्रकारांशी कायमच खटके उडत असतात. तसेच या अभिनेत्री ट्रोलदेखील होत असतात. मात्र महेश मांजरेकरांच्या लेकीच सध्या कौतुक होत आहे.
अभिनेत्री सई मांजरेकर नुकतीच जुहूमध्ये एका ठिकाणी जात असताना पापराराझिनी फोटोची मागणी केली. त्यावर तिने फोटो काढून दिले. तिथेच एका लहान मुलगा उपस्थित होता, बहुतेक तिचा चाहता असावा, सईने फोटो काढून झाल्यानंतर स्वतः त्या मुलाकडे गेली त्याची विचारपूस केली आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. तिच्या या कृत्याचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. एकाने लिहले की खूप साधी आणि सरळ मुलगी तर एकाने लिहले की, ‘खूपच निष्पाप मुलगी आहे. एकाने तिला ‘गोंडस’ मुलीची उपमा दिली आहे.
क्रिकेट सोडून अभिनय क्षेत्रात झळकणार पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?
सईने ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने अभिनेता सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका बजावली होती. हिंदीच्या बरोबरीने ती आता तेलगू चित्रपटात आपला ठसा उमटवणार आहे. नुकतीच ती मेजर या चित्रपटात दिसली होती.
मध्यंतरी सई यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला याला डेट करत असल्याचं बोललं जात होत, मात्र सईने आम्ही दोघंही मैत्री व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच नात्यात नाही आहोत. त्यामुळे आम्ही एकमेकांना डेट करत आहोत ही फक्त अफवा आहे असे स्पष्टीकरण दिले होते.