अभिनेत्री सारा अली खान तिच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने विकी कौशल आणि सारा अली खान ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सारा ‘जरा हटके जरा बचके’ प्रमोशनमध्ये व्यस्त असून राजस्थानातील विविध ठिकाणांना भेट दिल्यावर आता अभिनेत्री थेट चेन्नईत पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा फोन नंबर लीक? अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर दिली धमकी…

चेन्नईत गेल्यावर सारा अली खानने दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेतला. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर डोसा-चटणी आणि चहाचा फोटो शेअर करीत चेन्नई-तामिळनाडू असे लोकेशन टाकले आहे. मात्र, चेन्नईत आल्यावर साराला दोन खास व्यक्तींची आठवण येत असून या दोन्ही व्यक्तींना साराने आपल्या फोटोमध्ये टॅग केले आहे. डोसा-चटणीचा फोटो शेअर करीत साराने तिचे ‘अतरंगी रे’ चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय आणि या चित्रपटातील तिचा सहकलाकार धनुष यांना टॅग केले असून “मी तुम्हाला मिस करतेय…” असेही लिहिले आहे.

हेही वाचा : शाहिद कपूरच्या बहुचर्चित ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार रिलीज

आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ चित्रपटात अभिनेत्री सारा अली खानने २०२१ मध्ये काम केले होते. चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना सारा आणि धनुष ही नवी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळाली होती. साराचा हा चित्रपट ओटीटी माध्यमावर रिलीज झाला होता तसेच या चित्रपटातील साराच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळाली होती. त्यामुळेच चेन्नई गेल्यावर डोसा खाताना साराने आवर्जून दिग्दर्शक आनंद एल राय आणि सहकलाकार धनुषची आठवण काढली आहे.

हेही वाचा : बॉलीवूडचा कोणता सेलिब्रिटी रणबीरच्या लेकीला चांगलं सांभाळेल? अभिनेता म्हणाला, “हा सुपरस्टार राहासाठी परफेक्ट…”

दरम्यान, सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ २ जूनला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर सारा अभिनेता आदित्य रॉय कपूरसह ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटात झळकणार असून हा सिनेमा ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.