अभिनेत्री सयानी गुप्ता ‘जॉली एलएलबी २’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘बार बार देखो’ सारख्या अनेक चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक गाजलेले चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. तिने एका मुलाखतीत तिला सिनेक्षेत्रात काम करताना आलेले काही अनुभव सांगितले आहेत. इंटिमेट सीनचे शूटिंग करताना एका सहकलाकाराने कशी मर्यादा ओलांडली, तो प्रसंगही तिने सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सयानी सध्या तिच्या ‘ख्वाबों का झमेला’ या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर्स असतात, त्यांच्याबद्दल तिने तिचं मत मांडलं. तसेच तिला सेटवर आलेला वाईट अनुभव तिने सांगितला. दिग्दर्शकाने शॉट कट म्हटल्यानंतरही एक अभिनेता तिला किस करत होता, असं ती म्हणाली. मात्र सयानीने या अभिनेत्याचे नाव किंवा ही घटना कोणत्या सीरिज अथवा सिनेमाच्या सेटवर घडली, त्याचा उल्लेख करणं टाळलं. सयानी म्हणाली की निर्माते असे इंटिमेट सीन अतिशय व्यावसायिक पद्धतीने शूट करतात. असे सीन करण्याआधी बरीच चर्चा होते, पण अनेकजण त्याचा फायदा घेतात.

८ वर्षांच्या अफेअरनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

इंटिमेट सीन शूट करताना असभ्य वागला सहकलाकार

रेडिओ नशाशी बोलताना सयानी म्हणाली की भारतात आता इंटिमसी को-ऑर्डिनेटरची कल्पना स्वीकारली गेली आहे, याचा तिला आनंद आहे. तिने २०१३ मध्ये ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’साठी पहिल्यांदा एका प्रोफेशनल इंटिमसी को-ऑर्डिनेटरबरोबर काम केलं होतं. तिने तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या अभिनेत्याबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. “बरेच लोक इंटिमेट सीनचा फायदा देखील घेतात आणि माझ्या बाबतीत असं घडलं की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो (सहकलाकार) मला किस करत राहिला,” असं सयानी म्हणाली.

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

सयानीने सांगितला दुसरा अनुभव

सयानीने एका सीनच्या शूटिंगची आठवण सांगितली. तो सीन शूट करताना खूप अस्वस्थ वाटलं होतं, असं म्हणत तिने काय घडलं होतं ते कथन केलं. हा इंटिमेट सीन नव्हता आणि ती गोव्यात ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’च्या पहिल्या सीझनचे शूटिंग करत होती. “मला समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर तोकड्या कपड्यांमध्ये झोपायचं होतं. क्रू मेंबर्स आणि इतर ७० लोक तिथे माझ्यासमोर होते. त्यावेळी मला खूप अस्वस्थ व असुरक्षित वाटलं; कारण माझ्या समोर जवळपास ७० माणसं तिथं होती,” असं सयानी म्हणाली.

नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावर विश्वास असलेल्या स्पर्धकाला विचारले असे प्रश्न, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; पाहा Video

सयानी म्हणाली की तिच्या शेजारी कोणीतरी शाल घेऊन उभं राहावं अशी तिची इच्छा होती पण तसं झालं नाही. गर्दीत शूट करताना असं बरेचदा होतं. तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, पण इतरांच्या ते ध्यानीमनीही नसतं. फक्त इंटिमेट सीनच्या शूटिंगबद्दल नाही तर इतर सीन शूट करतानाही मर्यादा ओलांडल्या जातात, असं सयानी म्हणाली.