‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील रणवीर-आलियाची केमिस्ट्री सर्वांना आवडलीच पण त्यापेक्षाही अधिक चर्चा या चित्रपटातील एका वेगळ्याच सीनची होत आहे. हा सीन म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचा किसिंग सीन. हा सीन पाहिल्यावर शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तर यांची काय प्रतिक्रिया होती हे आता समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्याबरोबरच शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक किसिंग सीनही आहे. हा सीन सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता.

आणखी वाचा : “सेटवर रणवीर-आलिया…”, क्षिती जोगने सांगितला करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये काम करण्याचा अनुभव

शबाना आझमी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या किसिंग सीनवर त्यांचे पती जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “मी पडद्यावर किसिंग सीन दिला याबद्दल त्यांना कुठलीही तक्रार नव्हती. पण हा सीन चित्रपटगृहात सुरू असताना प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते. तेव्हा माझ्या बाजूला बसलेले जावेद अख्तर म्हणाले, माझ्या बाजूला बसलेल्या या महिलेला मी ओळखत नाही.” तर याच बरोबर या किसिंग सीनची एवढी चर्चा होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं, असंही शबाना आझमी यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार

दरम्यान ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट चित्रपटगृहात खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तर सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने ६७ हून अधिक कोटींची कमाई केली आहे.