‘मुंज्या’ या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसांतच जवळपास २० कोटींहून जास्त कमाई केली आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या चित्रपटात बॉलीवूडमधील मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून शर्वरी भारावली आहे.

शर्वरीने ‘बंटी और बबली २’ या बिग बजेट चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण केले होतं. पण या मराठी मुलीला कोकणातील लोककथेवर बेतलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळाली याचा खूप आनंद आहे. शर्वरीचा ‘मुंज्या’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा दुसरा चित्रपट असून या चित्रपटाच्या यशामुळे तिचं खूप कौतुक होत आहे.

‘मुंज्या’ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, ३० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने रविवारी कमावले तब्बल…

शर्वरी महाराष्ट्रीय आहे आणि कोकणातील लोककथेवर आधारित तिच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरकडे ज्या पद्धतीने आकर्षित केलंय, हे पाहून तिला आनंद झाला आहे. “मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, त्यामुळे मराठी लोककथेवर आधारित चित्रपटाला मिळणारं इतकं प्रेम पाहून आणि लोक त्याचं कौतुक करत आहेत हे पाहणं खूप छान वाटतंय. महाराष्ट्रीय लोककथा राष्ट्रीय स्तरावर गाजत आहेत आणि त्यावर बनलेला एक चित्रपट हिट होतोय, हे पाहून मला खूप आनंद होतोय,” अशा भावना शर्वरीने व्यक्त केल्या.

कुजलेल्या अवस्थेत आढळला काजोलच्या को-स्टारचा मृतदेह, तीन दिवस वाट पाहूनही कुटुंबीय न आल्याने अभिनेत्रीवर पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

मुंज्याच्या बॉक्स ऑफिसवरील अप्रतिम कामगिरीबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, “मुंज्याने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कामगिरी केली आहे. मी सध्या खूपच आनंदी आहे. माझ्या चित्रपटाला इतकं मोठं यश मिळणं हे माझा आत्मविश्वास वाढवणारं आहे. मला सोशल मीडियावरही संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे, हीच माझ्या कामाची मोठी पोचपावती आहे.”

“स्तनांचा आकार वाढविण्यासाठी दबाव…”, बॉलीवूड अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “मी खऱ्या आयुष्यात…”

ती पुढे म्हणाली, “मुंज्यामधील माझं पहिलं गाणं तरस प्रेक्षकांना कसं वाटेल याबद्दल मला खात्री नव्हती आणि आता मी पाहतेय की त्या गाण्यावर लोक त्यावर नाचत आहेत आणि थिएटरमध्ये गाण्याचा आनंद घेत आहेत. हे सगळं पाहून खूप भारी वाटत आहे. मी मोठी होत असताना, चित्रपटाच्या शेवटी डान्स नंबर पाहण्यासाठी मी जागेवरून हलायचे नाही आणि आता लोक थिएटरमध्ये माझ्या गाण्यांचा आनंद घेत आहेत हे पाहणं खूपच सुखावणारं आहे.”

‘मुंज्या’ चित्रपटात शर्वरीशिवाय मोना सिंह, अभय वर्मा, सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या आदित्य सरपोतदारने केलं आहे.

Story img Loader