अभिनेत्री शेफाली शाह ही सध्याच्या घडीची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही वर्षात ती अनेक चित्रपटांमध्ये आणि वेब सिरिजमध्ये झळकली. ‘दिल्ली क्राईम’ या वेब सिरिजमुळे तीची लोकप्रियता आणखीनच वाढली. तिच्या कामाबरोबर असते तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. आता तिने अंगावर काटा आणणारा एक धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे.
शेफाली नेहमीच कोणत्याही गोष्टीबद्दल खुलेपणाने व्यक्त होत असते. शेफालीने नुकताच तिच्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितलं. या चित्रपटात तिने रिया वर्मा नावाच्या लहानपणी लैंगिक शोषण झालेल्या एका मुलीची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात तिच्याबरोबर नसिरुद्दीन शाह, लिलेट दुबे, वसुंधरा दास, विजय राज, रजत कपूर, रणदीप हुड्डा आणि सोनी राजदान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटातील कथेला धरून शेफालीने नुकताच तिच्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग संगितला.
आणखी वाचा : “आजही मला रिक्षातून जाताना…”, ‘दिल्ली क्राईम’ फेम शेफाली शाहचे मोठे विधान
ती म्हणाली, “प्रत्येक जण अशा अनुभवातून गेलेला असतो. एकदा मी बाजारात फिरत होते तेव्हा खूप गर्दी होती आणि कोणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तेव्हा मला खूप विचित्र वाटले. मी याबद्दल कधीही कुठेच भाष्य केलं नाही कारण हे खूप लाजिरवाणं आहे. हे ऐकल्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडेल की मी पुढे काही का केले नाही? पण खरं तर तेव्हा तुम्ही स्वतःलाच अपराधी समजता. तुम्हालाच लाज वाटते आणि नंतर तुम्ही विसरून जाता, आतल्या आत दाबून ठेवतात. खरं सांगायचे तर मी याचा इतका कधीच विचार केला नाही की मी त्याबद्दल बोलेन.”
हेही वाचा : ‘तिला किस करताना मी व्हर्जिनिटी गमावली’, शेफाली शाहचा खुलासा
तिचे हे बोलणे आता खूप चर्चेत आले आहे. सोशल मीडियावरून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत तिने याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले त्याबद्दल खंबीरपणाचे कौतुक करत आहेत.